
महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या पावन भूमीत २०२७ मधे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा निमित्य आज महाराष्ट्र सरकार च्या वतीने विविध विकास कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे शुभहस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार, सर्वमंत्री श्री. छगन भुजबळ, श्री. गिरीश महाजन, श्री. दादाजी भुसे, श्री. उदय सामंत, श्री. जयकुमार रावल, श्री. शिवेंद्रराजे भोसले, श्री. माणिकराव कोकाटे, श्री. जयकुमार गोरे, श्री. नरहरी झिरवाळ, श्री. सुहास कांदे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
सदरील कार्यक्रमात ४१,२२७ किलोमीटर चे नवीन रस्ते व ५ नवीन पुलांचे तसेच सुमारे ३४०० कोटी रुपयांच्या एकूण 26 प्रकल्पांचे उदघाटन आणि भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. कार्यक्रमा निमित्य नाशिक महानगर पालिकेच्या वतीने संपूर्ण नाशिक करांना आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले आहे.




