महुआ मतदारसंघातून तेज प्रताप यादव पिछाडीवर

SHARE:

महुआ मतदारसंघातून तेज प्रताप यादव पिछाडीवर

बिहार – बिहारमधील महुआ मतदारसंघातून उभे असलेले जनशक्ती जनता दलाचे अध्यक्ष आणि लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव तेज प्रताप यादव हे पिछाडीवर आहेत.

निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार महुआतून लोक जनशक्ती पार्टी ( रामविलास) चे संजय कुमार सिंह हे आघाडीवर आहेत.
ते २,२९४ मतांनी पुढे आहेत.

राजदचे मुकेश कुमार रोशन हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तिसऱ्या क्रमांकावर AIMIM चे अमित कुमार आहेत तर चौथ्या क्रमांकावर तेज प्रताप यादव आहेत.

राजदमधून बाहेर काढल्यानंतर तेज प्रताप यांनी जनशक्ती जनता दलाची स्थापना केली आणि स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला.

Leave a Comment

अधिक वाचा