
SIR मुळे NDA ला प्रचंड बहुमत मिळत असल्याचा अखिलेख यादव यांचा आरोप बिहार निवडणुकीत आलेल्या कलांनुसार NDAची प्रचंड बहुमताकडे वाटचाल सुरू आहे.
यावर उत्तर प्रदेशचे विरोधी पक्ष नेते आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. NDA ची प्रचंड बहुमताकडे वाटचाल म्हणजे निवडणुकीय षड्यंत्र असल्याचे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्ह्यू (SIR) मुळेच NDA ला बहुमत मिळतंय असं त्यांनी म्हटलं.
बिहारमध्ये जो SIR चा खेळ खेळण्यात आला तो तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यात आम्ही होऊ देणार नाहीत, कारण या निवडणुकीय षड्यंत्राचे बिंग आता फुटले आहे असे अखिलेश यादव यांनी म्हटले. अखिलेश यादव म्हणाले, की निवडणुकीतील प्रकारांवर देखरेख ठेवण्यासाठी समाजवादीचे कार्यकर्ते काम करतील.
अखिलेश यादव यांनी या कार्यकर्त्यांसाठी PDA प्रहरी असे नाव दिले आहे. हे कार्यकर्ते निवडणुकीच्या कारभारावर लक्ष ठेवतील आणि जर काही गैर प्रकार आढळला तर तक्रार नोंदवतील असे अखिलेश यांनी सांगितले होते.
सध्या हाती आलेल्या आकडेवारीनुसार, NDA १९९ जागांवर आघाडीवर आहे. विभानसभेच्या एकूण २४३ जागा आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी १२२ जागांची आवश्यकता असते.




