काँग्रेस नेते भूपेश बघेल यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना दिल्या शुभेच्छा…

SHARE:

बिहार विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंतच्या कलांमध्ये दिसलेल्या महागठबंधनच्या पिछाडीवर काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले की, “जे कल दिसत आहेत, त्यावरून एनडीएला तीन चतुर्थांश बहुमत दिसत आहे. याबाबत अमित शहा आधीच बोलले आहेत.”

“या सर्वासाठी एक व्यक्ती जबाबदार असेल तर ती म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार. त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. निवडणूक आयोगानं ज्या पद्धतीनं काम केलं, त्यावरून बिहार निवडणुकीत ज्ञानेश कुमार यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती, हे अत्यंत स्पष्ट आहे.”

कांग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गहलोत यांनी म्हटलं की, “लोकशाही धोक्यात आहे. जी परिस्थिती हरियाणानंतर महाराष्ट्रात दिसली तीच इथं दिसली. ज्याप्रकारे पैसा आणि शक्तीचा वापर करण्यात आला, त्याची कल्पनाही करता येणार नाही. निवडणूक आयोग त्यांची मदत करत आहेत.”

“निष्पक्ष निवडणुका झाल्या नाही तर वोट चोरी होते. निवडणुकांत 1 कोटी 35 लाख महिलांच्या खात्यांमध्ये 10 हजार रुपये गेले. निवडणूक आयोगाला काय झालं आहे? राजस्थानात निवडणुकांच्या घोषणांनंतर पेन्शन मिळणं बंद झाली होती. पण इथं सगळं सुरू होतं.”

 

Leave a Comment

अधिक वाचा