
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एक्स वर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी पंतप्रधान मोदी आणि एनडीएतील इतर सहकाऱ्यांचे आभार मानले.
“२०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत, राज्यातील जनतेनं प्रचंड बहुमत देऊन आमच्या सरकारवर विश्वास व्यक्त केला आहे. यासाठी, राज्यातील सर्व मतदारांना नमन आणि मनापासून आभार. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचे मनापासून आभार मानतो,” असं नितीश कुमार यांनी लिहिलं.
“निवडणुकीत एनडीए आघाडीने पूर्ण एकता दाखवली आणि प्रचंड विजय मिळवला. या विजयाबद्दल आमचे सर्व एनडीए सहयोगी चिराग पासवान, जितन राम मांझी आणि उपेंद्र कुशवाह यांचे आभार. तुमच्या पाठिंब्याने, बिहार आणखी प्रगती करेल आणि देशातील सर्वात विकसित राज्यांपैकी एक बनेल,” असंही त्यांनी म्हटलं.
या निवडणुकीच्या ट्रेंडमध्ये, एनडीए पूर्ण बहुमताकडे वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे. एनडीए २०२ तर महागठबंधन अवघ्या ३५ जागांवर आघाडीवर आहे.




