
कोलकाता: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याचे नाणेफेक हे दक्षिण आफ्रिकेने जिंकले आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात कर्णधार शुभमन गिल ला दुखापत झाली होती. आता गिल पुन्हा मैदानात उतरणार की नाही यावर बिसिसीआय ने मोठी अपडेट दिली आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी, भारताचा कर्णधार गिल पहिल्या डावात फक्त तीन चेंडू खेळल्यानंतर रिटायर हर्ट झाला. दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज सायमन हार्मरच्या गोलंदाजीवर स्वीप शॉट मारताना गिलला मानेला दुखापत झाल्यामुळे वेदना होत असल्याचे दिसून आले आणि त्याने चार धावा केल्या. त्यानंतर गिलने त्याच्या फिजिओशी चर्चा केली आणि पॅव्हेलियनमध्ये परतण्याचा निर्णय घेतला. बीसीसीआयने आता गिलच्या प्रकृतीबद्दल एक मोठी अपडेट जारी केली आहे.
दुपारच्या पहिल्या सत्रात भारतीय संघाचा कर्णधार गिल फलंदाजीसाठी आला, त्यानंतर तो रिटायर हर्ट झाला. दुपारच्या जेवणानंतर खेळ पुन्हा सुरू झाल्यावर, बीसीसीआयने गिलच्या दुखापतीबद्दल अधिकृत अपडेट जारी केले. बीसीसीआयने गिलच्या प्रकृतीबद्दल एक अपडेट जारी केले, ज्यामध्ये असे म्हटले आहे की त्याला मानेला दुखापत झाली आहे आणि आता तो बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. तो कसोटी सामन्यात फलंदाजीला परतेल की नाही हे त्याच्या प्रकृतीनुसार ठरवले जाईल.




