
नागपूर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत आज नागपूर येथील जननायक, ‘धरती आबा’ भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त जनजातीय गौरव वर्ष अंतर्गत राज्यस्तरीय ‘आदिवासी सांस्कृतिक महोत्सव’ येथे आदिवासी विकास विभागाच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण केले.
यावेळी भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आलेले विविध प्रकल्प :
- सुराबर्डी, नागपूर येथील गोंडवाना आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय तथा आदिवासी संशोधन व प्रशिक्षण उपकेंद्राचे भूमिपूजन.
- शासकीय आश्रमशाळा, घानवळ, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार, जि. पालघर येथील इमारतीचे लोकार्पण.
- शासकीय आश्रमशाळा, पळसुंडा, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार, जि. पालघर येथील प्रयोगशाळा इमारतीचे लोकार्पण.
- शासकीय आश्रमशाळा, देवगाव, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नाशिक येथील संकुलात मुलींच्या वसतिगृहाचे लोकार्पण.
उदघाटन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत देशाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रामुख्याने उपस्थित होते. सोबतच यावेळी राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री डॉ. अशोक उईके, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आमदार रविंद्र चव्हाण, आमदार डॉ. आशिष देशमुख इतर मान्यवर उपस्थित होते.




