सौदी अरेबियामध्ये बस दुर्घटना, दुर्घटनाग्रस्तांमध्ये अनेक भारतीय असल्याची शक्यता

SHARE:

प्रतिनिधिक फोटो
प्रतिनिधिक फोटो
प्रतिनिधिक फोटो
प्रतिनिधिक फोटो

सौदी अरेबियामध्ये भीषण बस दुर्घटना झाली आहे. या दुर्घटनेत अनेक भारतीयांचा समावेश असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तेंलगानाच्या मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे की मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सौदी अरेबियात भारतीयांना घेऊन जात असलेल्या बस दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केलं आहे.

मदीना येथे झालेल्या या बस अपघाताबद्दल भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही दुःख व्यक्त केले आहे. या बसमध्ये उमरा करण्यासाठी जाणारे भारतीय होते.

एस. जयशंकर म्हणाले, “सौदी अरेबियातील मदीना येथे झालेल्या भारतीय नागरिकांच्या दुर्घटनेने मला खूप दुःख झाले. रियाधमधील भारतीय दूतावास आणि जेद्दाहमधील वाणिज्य दूतावास या अपघातात जखमी झालेल्या भारतीय नागरिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना पूर्ण मदत करत आहे.”

सौदी अरेबियातील जेद्दाह या ठिकाणी असलेल्या भारतीय दूतावासाने देखील या घटनेबाबत दुजोरा दिला आहे. पण या व्यतिरिक्त या दुर्घटनेबाबत कोणतीही अधिकृत आणि विस्तृत माहिती मिळालेली नाही.

भारताच्या कॉन्सुलेट जनरलने यासाठी जेद्दाहमध्ये एक कंट्रोल रूमदेखील बनवले आहे. कॉन्सुलेट जनरलने म्हटले की सौदी अरेबियातील मदीनजवळ भारतीय यात्रेकरुंसोबत झालेल्या बस दुर्घटनेनंतर जेद्दाह या ठिकाणी भारतीय कॉन्सुलेटने कंट्रोल रूम बनवली आहे.

Leave a Comment

अधिक वाचा