शेख हसीना यांना बांगलादेश कोर्टाने सुनावला मृत्यूदंड, मानवतेविरुद्ध गुन्ह्यांसाठी दोषी ठरवत सुनावली शिक्षा

SHARE:

बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणानं माजी प्रधानमंत्री शेख हसीना यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये दोषी आढळल्यानंतर त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली.

गेल्या वर्षी जुलै-ऑगस्टमध्ये झालेल्या आंदोलनात झालेल्या हिंसाचार प्रकरणी शेख हसीना यांच्यावर मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांचा आरोप ठेवण्यात आला होता.

शेख हसीना भारतात निर्वासित म्हणून राहत आहेत, त्यामुळं त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्याविरुद्ध खटला चालवण्यात आला.

या प्रकरणी निकाल सहा भागात दिला जाईल, असं न्यायमूर्ती मोहम्मद गुलाम मुर्तझा मुझुमदार यांनी ४५३  पानांचा निकाल वाचून दाखवण्यापूर्वी सांगितलं.

🔵 सुनावणीचं बांगलादेश टेलिव्हिजनवर थेट प्रक्षेपण –

या सुनावणीत देण्यात आलेला निर्णय बांगलादेश टेलिव्हिजनवर थेट प्रक्षेपित करण्यात आला.

बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणात जूनमध्ये शेख हसीना यांच्यासह तीन जणांविरुद्ध पाच आरोप दाखल करण्यात आले होते.

या आधारावर, न्यायाधिकरणानं शेख हसीना आणि माजी गृहमंत्री असदुज्जमान खान कमाल यांच्याविरुद्ध अटक वॉरंटही देखील जारी केलं होतं.

बांगलादेशमध्ये गेल्यावर्षी सरकारविरोधी आंदोलनांमध्ये हिंसक निदर्शनं झाली. तत्कालीन प्रधानमंत्री शेख हसीना यांच्यावर मानवतेविरुद्धच्या या गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला होता. या आंदोलनामुळं शेख हसीना यांना ऑगस्ट २०२४  मध्ये सत्ता गमवावी लागली आणि त्या देशाबाहेर पळून गेल्या. तेव्हापासून त्या भारतात राहत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा