भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी ‘या’ स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता

SHARE:

भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी सेन्सेक्स ४००.७६ अंकांच्या घसरणीसह ८५ २३१ .९२ अंकांवर बंद झाला. तर, निफ्टीमध्ये १२४ अंकांची घसरण होऊन तो २६०६८.१५ अंकांवर तो बंद झाला. गेल्या आठवड्यात शेअर बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या गुंतवणूकदारांनी ३६००० कोटी रुपयांची कमाई केली. आता येत्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स बदल, जागतिक आर्थिक घडामोडींचा परिणाम म्हणून भारतीय शेअर बाजारात काही बदल पाहायला मिळू शकतात.

इंटरग्लोब एविएशनकडून इंडिगो या विमान वाहतूक कंपनीचं संचलन केलं जातं. बीएसईच्या टॉप ३० च्या सेन्सेक्स निर्देशांकात इंटरग्लोब एविएशनला स्थान दिलं जाईल. हे बदल २२ डिसेंबरपासून होणार आहेत. ज्याची घोषणा बीएसई इंडेक्स सर्व्हिसेसनं केली आहे. टाटा मोटर्स या शेअरचं विभाजन झालं आहे.

टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल कंपनीचा स्टॉक सेन्सेक्समधून बाहेर जाणार आहे. हे बदल २२ डिसेंबरला लागू होतील. कंपनीच्या शेअरध्ये ०.७५ टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. या कंपनीचा शेअर ३६२.५० रुपयांवर पोहोचला आहे.

क्सिस बँक सीरिज-९ अंतर्गत ५००० कोटी रुपयांचे डिबेंचर्स जारी करणार आहे. याद्वारे बँकेचा ५००० कोटी रुपये उभारण्याचा प्रयत्न आहे. यामध्ये २००० कोटींची बेस साईज आणि ३००० कोटींचा ग्रीन शू ऑप्शन असेल.

अमेरिकेच्या एफडीएनं १० नोव्हेंबर ते २१ नोव्हेबंर या कालावधीत लूपिनच्या गोवा उत्पादन सुविधेचं पाहणी केली. ही पाहणी From-४८३ सह पूर्ण झाली. कंपनीनं निर्धारित वेळेत समस्यांची पूर्तता करणार असल्याचं म्हटलंय.

एनटीपीसी ग्रीनची उपकंपनी अयाना रिन्यूएबल्स पॉवर प्रायवेट लिमिटेडला यश मिळालं आहे. आरईएमसी लिमिटेडकडून त्यांनी लिलावात १४०  मेगावॅट नवीकरणीयक्षम प्रकल्पाचं कॉनट्रॅक्ट मिळवलं आहे.

आरव्हीएनल कंपनीनं नॉदर्न रेल्वेच्या १८०.७७ कोटी रुपयांच्या प्रकल्पात एल-१ बिडर झाल्याची माहिती दिली. हा प्रकल्प UTR-MWP सेक्शनला अपग्रेड करण्यासाठीचा आहे. लखनौ विभागातील हे काम २४  महिन्यात पूर्ण करायचं आहे.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Leave a Comment

अधिक वाचा