राशींभविष्य – आज २७ नोव्हेंबर २०२५, आजचा वार गुरूवार आहे. मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे. आज मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरूवार असल्याने हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व १२ राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? १२ राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
मेष रास (Aries)
मेष राशीच्या लोकांनो आज नवीन ओळखी होतील मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील.
वृषभ रास (Taurus)
वृषभ राशीच्या लोकांनो आज दुसऱ्यांना सहकार्य देण्यात कायम तत्पर राहाल नावलौकिक वाढेल.
मिथुन रास (Gemini)
मिथुन राशीच्या लोकांनो आज कलाकारांची कला समाजापुढे येण्याची संधी मिळेल लेखकांच्या लिखाणास गती येईल.
कर्क रास (Cancer)
कर्क राशीच्या लोकांनो आज तुमच्या बोलण्यामध्ये एक वेगळाच गोडवा राहील व्यवसायात कामात एक प्रकारची शिस्त असेल.
सिंह रास (Leo)
सिंह राशीच्या लोकांनो आज कोणत्याही कामाचे उत्तम नियोजन कराल तरुणांच्या आवडीनिवडी बदलत राहतील.
कन्या रास (Virgo)
कन्या राशीच्या लोकांनो आज महिला मनाप्रमाणे खरेदी करतील बोलताना इतरांना तुमचा स्पष्ट वक्तेपणा जाणवेल.
तूळ रास (Libra)
तूळ राशीच्या लोकांनो आज कला आणि साहित्य क्षेत्रात चांगली फळे मिळतील कोणत्याही क्षेत्रात अति भावनाप्रधान ठेवून उपयोग नाही हे लक्षात यायला थोडा वेळ लागेल.
वृश्चिक रास (Scorpio)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज व्यवसाय नोकरीत तुमच्या मुली स्वभावाचे दर्शन जवळच्या लोकांना होईल त्यामुळे तुमच्या वाट्याला जाण्याचे धाडस कोणी करणार नाही.
धनु रास (Sagittarius)
धनु राशीच्या लोकांनो आज जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल, वैवाहिक जीवनात वैचारिक संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.
मकर रास (Capricorn)
मकर राशीच्या लोकांनो आज एकमेकांमध्ये होणारे गैरसमज दूर करताना नाकी दम येईल, आर्थिक व्यवहाराबाबत नातेवाईकांकडून फसवणूक होणार नाही ना, याची काळजी घ्या.
कुंभ रास (Aquarius)
कुंभ राशीच्या लोकांनो आज चारचौघात गप्पा चालू असताना शांतपणे श्रोत्याची भूमिका घ्याल, प्रवासाचे योग संभवतात.
मीन रास (Pisces)
मीन राशीच्या लोकांनो दुसऱ्याच्या मनात शिरून त्यांच्या भावना जाण्याचा प्रयत्न कराल, महत्वकांक्षा पूर्ण होतील.




