
आयकर विभाग : तुम्ही परदेशात कोणतीही मालमत्ता जमा केली असेल आणि तिचा तपशील आयकर रिटर्नमध्ये दिला नसेल, तर लगेच सावध व्हा. ज्यांनी परदेशात मालमत्ता खरेदी केली आहे आणि ITR मध्ये उघड केली नाही असे हजारो करदाते आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत. आयकर विभागाने म्हटले आहे की सुमारे २५००० करदात्यांची ‘हाय-रिस्क’ प्रकरणे ओळखली गेली आहेत ज्यात करदात्यांना आयकर रिटर्नमध्ये परदेशी मालमत्तेचा तपशील दिलेला नाही.
आयकर विभागाच्या रडारवर तुमची परकीय संपत्ती
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ म्हणजे CBDT शुक्रवारपासून अशा व्यक्तींना एसएमएस आणि ई-मेलद्वारे सतर्क करण्यास सुरुवात केली आहे अशी माहिती सूत्रांकडून समजली आहे. CBDT ने या व्यक्तींना सुधारित विवरणपत्रे दाखल करण्यासाठी आणि परदेशी मालमत्तेचा खुलासा करण्यासाठी या वर्षाच्या ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे अन्यथा नियमांनुसार दंडासह योग्य कारवाई केली जाईल. डिसेंबरच्या मध्यापासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यात इतर प्रकरणांचा समावेश करण्यासाठी मोहिमेची व्याप्ती वाढवली जाईल.
सूत्रांच्या माहितीनुसार ‘पहिल्या टप्प्यात २५०० प्रकरणे लक्ष्य केले जातील, एसएमएस आणि ई-मेल पाठवले जातील. करदात्यांना रिटर्नमध्ये सुधारणा करण्याचा आणि ३१ डिसेंबरपूर्वी परदेशी मालमत्ता उघड करण्यास सांगितले जाईल. इतरांना १५ डिसेंबरच्या आसपास कव्हर केले जाईल.’
याशिवाय वृत्तसंस्था पीटीआयच्या सूत्रांनी सांगितले की, ज्या मोठ्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांकडे परदेशात मालमत्ता आहे पण त्यांनी ती उघड केलेली नाही त्यांनाही या उपक्रमाचा भाग बनवण्यात आले आहे. उद्योग संस्था, आयसीएआय आणि विविध संघटनांनाही या समस्येबद्दल जागरूकता पसरवण्याची विनंती करण्यात आली आहे.
आयकर विभागाला परकीय संपत्तीची माहिती कशी मिळते?
सीबीडीटीला माहिती-सामायिकरण प्रणाली – कॉमन रिपोर्टिंग स्टँडर्ड (सीआरएस) आणि यूएस फॉरेन अकाउंट टॅक्स कम्प्लायन्स ॲक्ट अंतर्गत भारतीय रहिवाशांच्या परदेशातील आर्थिक मालमत्तेची माहिती मिळते. ही माहिती करदात्यांना रिटर्नमधील संभाव्य चुका ओळखण्यास आणि योग्य अनुपालनासाठी मार्गदर्शन करते. या मोहिमेचा उद्देश आयटीआरमधील परकीय मालमत्ता (फॉरेन असेट्स) आणि परकीय स्रोत उत्पन्न (एफएसआय) विभागांतर्गत अचूक आणि पूर्ण तपशील सुनिश्चित करणे आहे.
भारतीय नागरिकांच्या परदेशी मालमत्तेची सीबीडीटीला भागीदार देशांकडून मिळते जे कॉमन रिपोर्टिंग स्टँडर्ड्स (सीआरएस) चा भाग माहिती मिळते. फॉरेन अकाउंट टॅक्स कम्प्लायन्स ॲक्ट अंतर्गत अमेरिकेडूनही अशी माहिती मिळते, ज्यामुळे करदात्यांना आयकर रिटर्नमध्ये लपवलेल्या परदेशी मालमत्तेची माहिती उघड करता येते.




