सरकारी डिफेंस कंपनीला मिळाली २४६१ कोटी रुपयांची ऑर्डर, गुंतवणूकदारांचं लक्ष शेअरवर

SHARE:

अर्थ – भारत डायनेमिक्स लिमिटेड (बीडीएल) ही कंपनीवर गुंतवणूकदारांचे लक्ष असणार आहे. कारण या संरक्षण उत्पादन निर्मिती करणाऱ्या सरकारी कंपनीला १  डिसेंबर रोजी २४६१  कोटी रुपयांचा एक ऑर्डर मिळाली आहे. ही ऑर्डर संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

कंपनीला मिळालेली ऑर्डर

भारत डायनेमिक्स लिमिटेड कंपनीला मिळालेली ऑर्डर ही एका अतिरिक्त ऑर्डरचा भाग आहे. कंपनीला १३  नोव्हेंबर रोजी एक ऑर्डर मिळाली होती. त्याच ऑर्डरचा ही ऑर्डर अतिरिक्त भाग आहे. या ऑर्डरअंतर्गत बीडीएल अँटी-टँक गाइडेड मिसाइल्स आणि सरफेस टू एअर मिसाइल्सच्या आपत्कालीन खरेदीशी संबंधित काम करणार आहे. सोमवार, १  डिसेंबर रोजी बीडीएलचा शेअर   १.११ % नी वाढून १५३०  रुपयांवर बंद झाला. ५६०९५  कोटी रुपयांच्या बाजार भांडवलासह, भारत डायनेमिक्स आपल्या क्षेत्रातील चौथी सर्वात मोठी कंपनी आहे. गेल्या ५  वर्षांमध्ये कंपनीच्या शेअरने ८४०% चा जबरदस्त परतावा दिला आहे. मागील ३  वर्षांमध्ये २१७% चा परतावा मिळाला आहे.

शेअरची कामगिरी

गेल्या ३  महिन्यांत शेअरच्या किंमतीमध्ये ४% ने वाढ झाली आहे. मागील एका महिन्यात शेअरमध्ये ०.६४  टक्क्यांची घसरण झाली आहे. मात्र गेल्या एका आठवड्यात शेअरने गुंतवणूकदारांना ३% परतावा दिला आहे. गेल्या वर्षभरातही शेअरने चांगली कामगिरी केली आहे. मागील १  वर्षात शेअरने ३३% टक्क्यांसह ३९५.७५ रुपयांचा परतावा दिला आहे. ५  वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना तब्बल ८४८  टक्के रिटर्न दिला आहे. डिसेंबर २०२०  मध्ये या शेअरची किंमत १६१.३०  रुपये होती आज या शेअरची १५२९.५०  रुपये आहे. त्यामुळे ज्या गुंतवणूकदारांनी त्यावेळी गुंतवणूक केली आहे ते मालामाल झाले आहेत. भारत डायनेमिक्स कंपनीच्या शेअरचा ५२  आठवड्यांचा उच्चांक २०९६  रुपये आहे. तर ५२  आठवड्यांचा नीचांक ९०७  रुपये आहे.

Leave a Comment

अधिक वाचा