तिसऱ्या आघाडीबाबतच्या अफवांना आरिपा चे चोख प्रत्युत्तर..

SHARE:

तिवसा : शहर व तालुक्यात अलीकडील दिवसांत तिसरी आघाडी निर्माण झाल्याच्या बातम्यांनी तसेच काही ठिकाणी झालेल्या बॅनरबाजीमुळे जनमानसात संभ्रम निर्माण झाला आहे. या संदर्भात आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टी च्या तालुका कार्यकारिणीने अधिकृत भूमिका जाहीर केली असून, पक्षाचा कुठलाही अधिकृत प्रतिनिधी या आघाडीत सहभागी नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.पक्षाच्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टी ही निवडणूक आयोगाकडे विधिवत नोंदणीकृत असून तिची स्वतंत्र, अधिकृत कार्यकारिणी तिवसा तालुक्यात कार्यरत आहे. तिसऱ्या आघाडीत पक्ष सामील झाल्याबाबतची चर्चा ही पूर्णत निराधार, दिशाभूल करणारी व राजकीय डावपेच म्हणून केली जात आहे पक्षाने पुढे म्हटले आहे की वरिष्ठ पदाधिकारी किंवा राज्यस्तरीय नेतृत्वाकडून अशा कोणत्याही आघाडीबाबत पत्रव्यवहार किंवा आदेश प्राप्त झालेले नाहीत. तरीही काही व्यक्ती हेतूपुरस्सर अफवा पसरवून व बॅनरबाजी करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करीत असल्याचा आरोप पक्षाने केला आहे.
पक्षाच्या निवेदनात पुढे इशारा देण्यात आला—
“अशी दिशाभूल करणारी चर्चा व चुकीची राजकीय हालचाल तातडीने बंद न केल्यास, आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टीकडून याचा तीव्र निषेध करून योग्य ती कारवाई करण्यात येईल. आंबेडकरी विचारधारेचे नाव घेऊन किंवा पक्षाचे पदाधिकारी आहोत असा खोटा आव आणत पक्षाची प्रतिष्ठा मलीन करण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही व
तिवसा तालुक्यात आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टीची अधिकृत व स्वतंत्र कार्यकारिणी कार्यरत असून, याआधीही पक्षाने अधिकृत ते वर तालुक्यातील निवडणुका लढवल्या आहेत. येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकाही पक्ष स्वतंत्रपणे आणि ताकदीने लढवणार असल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी अफवांना बळी न पडता अधिकृत निवेदनांवर विश्वास ठेवावा, असे आवाहन आंबेडकरवादी रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय कमिटी सहसचिव सूरज लांडगे यांनी केले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा