
राशींभविष्य – वैदिक पंचांगानुसार, आज ५ डिसेंबर २०२५ , आजचा वार बुधवार आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व १२ राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? १२ राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
मेष रास (Aries)
मेष राशीच्या लोकांनो आज नोकरीमध्ये तुमच्या योग्य अंदाज मुळे संस्थेचा फायदा होईल, समय सूचकता राखाल.
वृषभ रास (Taurus)
वृषभ राशीच्या लोकांनो आज वरिष्ठांची मर्जी सांभाळाल विद्यार्थ्यांनी अति आत्मविश्वास टाळावा.
मिथुन रास (Gemini)
मिथुन राशीच्या लोकांनो आज बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागेल. नवीन जागा घेण्याच्या विचारात असाल तर त्यात यश मिळेल.
कर्क रास (Cancer)
कर्क राशीच्या लोकांनो आज तुमच्यातील कलाकार जागा होईल. आर्थिक घडी चांगली बसण्यासाठी आवश्यक असलेला पाया आज घातला जाईल.
सिंह रास (Leo)
सिंह राशीच्या लोकांनो आज नोकरीमध्ये तुम्ही मन लावून केलेल्या कामामुळे वरिष्ठ खूश होतील.
कन्या रास (Virgo)
कन्या राशीच्या लोकांनो आज शरीराला जास्त त्रास न देता होईल तेवढेच काम करणारे तुमचे रूप इतरांना नवीन भासेल.
तूळ रास (Libra)
तूळ राशीच्या लोकांनो आज स्त्रियांनी काम करण्यासाठी आवश्यक वेळ काढा, कारण ती यशाची पहिली पायरी असेल.
वृश्चिक रास (Scorpio)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज प्रत्येक गोष्टीत हिशेबी वृत्ती ठेवून चालनार नाही, हे आज कळून चुकेल.
धनु रास (Sagittarius)
धनु राशीच्या लोकांनो आज हाता तोंडाशी आलेल्या गोष्टी नकळत हातातून निसटून जाऊ शकतात.
मकर रास (Capricorn)
मकर राशीच्या लोकांनो आज कामाच्या वेळी काम आणि आरामाच्या वेळी आराम, हे सूत्र लक्षात ठेवा.
कुंभ रास (Aquarius)
कुंभ राशीच्या लोकांनो आज लेखकांच्या कल्पनाशक्तीला उधाण येईल, गुणशास्त्रांचा अभ्यास करणाऱ्यास कामाचे समाधान लाभेल.
मीन रास (Pisces)
मीन राशीच्या लोकांनो आज मित्रांना अडीअडचणीच्या काळात मदतीचा हात पुढे कराल, नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी नवीन कल्पना राबवाल.




