
राशींभविष्य – वैदिक पंचांगानुसार, आज ८ डिसेंबर २०२५ , आजचा वार सोमवार आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व १२ राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? १२ राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
मेष रास (Aries)
मेष राशीच्या लोकांनो आज प्रेम प्रकरणांमध्ये तरुणांना यश मिळेल, स्वप्नांची पूर्णत्वाकडे वाटचाल सुरू होईल.
वृषभ रास (Taurus)
वृषभ राशीच्या लोकांनो आज जुन्या विचारांना उजाळा द्याल, नोकरी व्यवसायात प्रचंड कष्ट पडतील.
मिथुन रास (Gemini)
मिथुन राशीच्या लोकांनो आज काळजी करण्यापेक्षा काळजी घेण्याची सवय अंगी बाळगा, आत्मविश्वास आणि उत्साह वाढवावा लागेल.
कर्क रास (Cancer)
कर्क राशीच्या लोकांनो आज आर्थिक येणे लांबण्याची शक्यता आहे, अपेक्षित संधी क्वचितच लाभतील.
सिंह रास (Leo)
सिंह राशीच्या लोकांनो आज हुशार आणि उद्योगप्रियतेमुळे यशाला खेचून आणाल, महिलांना घरात तडजोडी करावी लागतील.
कन्या रास (Virgo)
कन्या राशीच्या लोकांनो आज व्यवहाराचतुर्य उत्तम असल्यामुळे वेळ मारून नेण्यात हुशार राहाल.
तूळ रास (Libra)
तूळ राशीच्या लोकांनो आज सरकारी कामांमध्ये पूर्वीपासून येणारे अडथळे दूर होऊन जातील.
वृश्चिक रास (Scorpio)
वृश्चिक राशीच्या लोकांनो कामांना वेग येईल, व्यवसाय नोकरीत तुम्ही काम कराल, त्याला भाग्याची साथ लाभेल.
धनु रास (Sagittarius)
धनु राशीच्या लोकांनो आज गुप्त शत्रूंच्या कारवायांना तोंड द्यावे लागेल, नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना यश मिळेल.
मकर रास (Capricorn)
मकर राशीच्या लोकांनो आज घरामध्ये एक शिल्लक कारणावरून वाद होण्याची शक्यता आहे, परंतु अनेक गोष्टींचा लाभ मिळेल.
कुंभ रास (Aquarius)
कुंभ राशीच्या लोकांनो आज कामाच्या ठिकाणी काही ठोस निर्णय घेणे मुश्किल होऊन बसेल.
मीन रास (Pisces)
मीन राशीच्या लोकांनो आज कोणत्याही कागदपत्रांवर सह्या करताना खबरदारी घेणे आवश्यक आहे.




