२०० कोटींचं अमिष दाखवून ३० कोटींवर डल्ला; बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाला पत्नीसह अटक, नेमकं प्रकरण काय?

SHARE:

मुंबई – बॉलिवूडमध्ये खळबळ माजवणारी बातमी समोर आली आहे. मुंबईतील सुप्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक विक्रम भट आणि त्यांच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे. प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक विक्रम भट्ट यांना राजस्थान पोलीस आणि मुंबई पोलिसांनी संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली आहे. विक्रम भट्ट यांना रविवारी संध्याकाळी मुंबईतील अंधेरी पश्चिमेकडील यारी रोड परिसरातून ताब्यात घेण्यात आलं आहे. चित्रपटांच्या नावाखाली राजस्थानमध्ये एका डॉक्टरची 30 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे.

राजस्थान पोलिसांनी रविवारी मुंबईत प्रसिद्ध चित्रपट निर्माते विक्रम भट्ट यांना अटक केली. उदयपूर येथील उद्योजक आणि भारतीय इंदिरा ग्रुप ऑफ कंपनीजचे मालक डॉ. अजय मुरडिया यांची 30 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे. पोलिसांच्या पथकानं विक्रम भट्ट यांना मुंबईतील यारी रोडवरील गंगा भवन अपार्टमेंटमधून अटक केली आहे. जिथून विक्रम भट्ट यांना पोलिसांनी अटक केली, ते त्यांच्या मेहुणीचं घर असल्याचं सांगितलं जातंय. आता त्यांना उदयपूरला नेण्यासाठी पोलीस वांद्रे न्यायालयात ट्रान्झिट रिमांड अर्ज दाखल करणार आहेत.

विक्रम भट्ट यांच्यावर आरोप काय?

१७  नोव्हेंबर रोजी, आयव्हीएफ हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. मुरडिया यांनी विक्रम भट्ट यांच्यासह आठ जणांविरुद्ध FIR दाखल केलेला. एका कार्यक्रमादरम्यान त्यांची भेट दिनेश कटारिया यांच्याशी झाली, ज्यांनी डॉक्टरांच्या पत्नीवर बायोपिक बनवण्याचा प्रस्ताव दिलेला. असा दावा करण्यात आला होता की, हा संपूर्ण चित्रपट देशाला त्यांच्या पत्नीच्या योगदानाबद्दल माहिती देईल. या संदर्भात, डॉक्टरांना २४  एप्रिल २०२४  रोजी मुंबईतील वृंदावन स्टुडिओमध्ये बोलावण्यात आलेलं. दरम्यान, नंतर असं उघड झालंय की, संपूर्ण प्रकरण फसवणुकीचं होतं आणि कोट्यवधी रुपये उकळण्यात आलेले. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, डॉ. मुरडिया यांनी असाही आरोप केला की, विक्रम भट्ट सातत्यानं सिनेमाच्या निर्मितीचं कारण देत पैशांची मागणी करायचे.

विक्रम भट्ट यांच्याविरोधात लूक आऊट नोटीसही जारी करण्यात आलेली

विक्रम भट्ट यांच्याविरोधात लूक आऊट नोटीसही जारी करण्यात आलेली. २९  नोव्हेंबर रोजी उदयपूर पोलिसांनी विक्रम भट्ट आणि त्यांची पत्नी श्वेतांबरी भट्ट यांच्यासह इतर सहा आरोपींविरुद्ध लूकआउट नोटीस जारी केली. त्यांना ८  डिसेंबरपर्यंत उदयपूर पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. कायदेशीर नोटीसमध्ये त्यांना देशाबाहेर प्रवास करण्यासही मनाई करण्यात आली होती. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या प्रकल्पासाठी विक्रम भट्ट यांनी ज्या कंपनीची माहिती दिलेली, ती कंपनी त्यांची पत्नी श्वेतांबरी भट्ट यांच्या नावानं VSP LLP नावाची कंपनी नोंदणीकृत होती.

याप्रकरणी राजस्थान पोलिसांनी विक्रम भट्ट आणि इतर सहा ते सात जणांच्या विरोधात 20 दिवसांपूर्वी गुन्हा दाखल केले होते. याच फसवणुकी प्रकरणी राजस्थान पोलिसांच्या एक टीमनं मुंबईच्या वर्सोवा पोलिसांचा मदतीनं विक्रम भट्ट आणि त्यांच्या पत्नीला यारी रोड परिसरातून अटक केली आहे. अटक केल्यानंतर राजस्थान पोलिसांनी हॉलिडे कोर्टात त्यांच्या ट्रान्झिट रिमांड घेऊन पुढील चौकशीसाठी राजस्थानला घेऊन निघाले आहेत. प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट्ट यांना पोलिसांनी अटक केल्यामुळे बॉलिवूड हादरलं आहे.

 

Leave a Comment

अधिक वाचा