आठवड्याची खराब सुरुवात; शेअर बाजारात आपटी बॉम्ब, गुंतवणूकदार धास्तावले, ​घसरणीच्या वणव्यात ८ लाख कोटी राख…

SHARE:

अर्थ – आरबीआयने रेपो दरात कपात, बँकांना सुमारे १.५  लाख कोटी रुपयांचा रोखता आधार आणि तटस्थ भूमिका ही सर्व कारणे बाजाराला सोमवारी, आठवड्याच्या पहिल्या व्यापार दिवशी, तेजीच्या दिशेने नेण्यासाठी सज्ज होती पण आठवड्याची सुरुवातच अडखळली. सार्वजनिक भावनांना धक्का देत शेअर बाजार इतका कोसळला की गुंतवणूकदारांना काही तासांतच अंदाजे 8 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. सेन्सेक्स ८००  अंकांनी घसरला, तर निफ्टी २८०  अंकांनी खाली आला.

अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या बैठकीपूर्वी गुंतवणूकदारांनी घेतलेली सावधगिरी बाजारातील विक्रीमागचे एक प्रमुख कारण होते.याव्यतिरिक्त सतत चालू असलेली FII विक्री, कमकुवत रुपया, वाढत्या कच्च्या तेलाच्या किमती आणि वाढत्या भारतातील VIX यांचाही बाजारातील भावनांवर परिणाम झाला. अशा परिस्थिती, सोमवारी शेअर बाजारातील या घसरणीमागील पाच प्रमुख कारणे पाहूया.

इंडिगो शेअर्सचे हाल बेहाल

त्याचवेळी, इंडिगोच्या शेअर्समधील घसरणीमुळे भावनांवर लक्षणीय परिणाम झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या दरम्यान, पुढील आठवड्यात फेडरल रिझर्व्हची बैठक होत असून यावेळी २५  बेस पॉईंट्सची कपात अपेक्षित आहे पण, जगातील इतरत्र केंद्रीय बँका व्याजदरांवर विराम देऊ शकतात. परिणामी, गुंतवणूकदार सावध भूमिका घेत असून याशिवाय रुपयाची घसरण आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती ही देखील शेअर बाजारातील घसरणीची प्रमुख कारणे आहेत.

गेल्या काही दिवसांतील सततच्या चढ-उतारानंतर सोमवारी इंडिगोच्या शेअर्समध्येही मोठी घसरण झाली, जो सप्टेंबर 2024 नंतरचा सर्वात वाईट दिवस ठरला आणि ७.५% पडझड झाली. कंपनीचे मार्केट कॅप आता २  लाख कोटी रुपयांच्या खाली गेले आहे.

घसरणीच्या वणव्यात ८  लाख कोटी स्वाहा
दरम्यान, आठवड्याच्या सुरुवातीच्या या घसरणीमुळे बाजारातील गुंतवणूकदारांनाही मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. गुंतवणूकदारांच्या नुकसानाची व्याप्ती बीएसईच्या मार्केट कॅपवर अवलंबून असते, परिणामी शुक्रवारी शेअर बाजार बंद झाला तेव्हा बीएसईचे मार्केट कॅप ४,७०,९६,८२६ .७५  कोटी रुपये होते. तर सोमवारच्या ट्रेडिंग सत्रात ४,६३,०१,२०७.८६  कोटींवर घसरले, म्हणजे बीएसईचे मार्केट कॅप ७,९५,६१८.८९  कोटी रुपयांनी कमी झाले.

 

Leave a Comment

अधिक वाचा