
मुंबई – उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतर्फे मातोश्रीवर काल रात्रीपासून एबी फॉर्म वाटपाला सुरुवात झाली आहे. ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युती झाली आहे. ज्या जागा शिवसेनेसाठी निश्चित झाल्या आहेत, त्या जागांवरती पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रात्री मातोश्रीवरून एबी फॉर्म दिले आहेत. काल रात्री जवळपास १०० पेक्षा अधिक जणांना एबी फॉर्म दिले असल्याच समजतंय. तसेच मोठ्या प्रमाणात तरुणांना आणि महिलांना संधी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने दिलेली आहे. मातोश्रीवरून एबी फॉर्म वाटपाची माहिती कळताच मातोश्रीच्या बाहेर कार्यकर्त्यांची मोठी रीघ लागली होती. स्वतः उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक उमेदवाराशी चर्चा करून हे ए बी फॉर्म दिले असल्याचं समजते.
अनेकांना अधिकृत उमेदवारी अर्ज मिळाला असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हसू पाहायला मिळाले. मात्र गेले अनेक वर्ष उमेदवारीसाठी प्रयत्न करणारे देखील मातोश्रीवर पोहोचले होते. काहींना एबी फॉर्म न मिळाल्याने त्यांनी देखील उघडपणे आपली नाराची व्यक्त केलेली पहायला मिळाली.
शिवसेना उबाठा तर्फे काल रात्री अनेकांना एबी फॉर्म देण्यात आला. त्यात अनेकांनी tv9 मराठी सोबत आपल्या भावना व्यक्त केल्या.
साधना वरस्कर – वॉर्ड १००
संजना कासले – वॉर्ड २५६
साईनाथ कटके – वॉर्ड १६४ चांदीवली
एड सुधीर खातू – वॉर्ड १६८ कुर्ला
सुवर्णा मोरे – वॉर्ड १६७ कुर्ला कलिना
हरी शास्त्री ( जावई श्रीकांत सरमळकर) – वॉर्ड ९५
अंकित सुनील प्रभू ( सुनील प्रभू यांचा मुलगा ) – वॉर्ड ५४ ( गोरेगाव )
अक्षता टंडन – वॉर्ड १०१ ( वांद्रे पश्चिम )
प्रज्ञा भूतकर ( तिकीट मिळाला नाही म्हणून नाराज महिला ) – वॉर्ड ९४
शिल्पा अजय भोसले – वॉर्ड १२६
विठ्ठल गोविंद लोकरे – वॉर्ड क्रमांक १४१
सुनंदा विठ्ठल लोकरे – वॉर्ड क्रमांक १४२
समीक्षा दीपक सक्रे – वॉर्ड क्रमांक १३२
अर्जुन आनंद शिंदे – वॉर्ड क्रमांक १३८
महादेव आंबेकर – वॉर्ड क्रमांक १३७
शमीन बानो खान – वॉर्ड क्रमांक १३४
हर्षदा गजानन पाटील – वॉर्ड १७६ (सायन कोळीवाडा)
वर्सोवा सहा वॉर्ड
प्रभाग क्र. ५९ यशोधर (शैलेश )फणसे
प्रभाग क्र. ६० मेघना विशाल काकडे माने
प्रभाग क्र. ६१ सेजल दयानंद सावंत
प्रभाग क्र. ६२ झीशान चंगेज मुलतानी
प्रभाग क्र. ६३ देवेंद्र (बाळा) आंबेरकर
प्रभाग क्र. ६४ सबा हारून खान




