मुंबईत मनसेचा पहिला उमेदवार, राज ठाकरेंनी स्वत: AB फॉर्म दिला, उमेदवाराचा कंठ दाटला!

SHARE:

मुंबई – मुंबई महानगरपालिच्या निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेने आतापर्यंत कुठलीही यादी जाहीर केलेली नाही. मात्र आतापर्यंत ९० जणांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत. त्यातील 55 जणांची नावे समोर आली आहेत.

आता मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी देखील मुंबई महानगरपालिकेसाठी उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप सुरु केले आहे. मुंबईत मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांना पहिला एबी फॉर्म देण्यात आला.

स्वत: राज ठाकरेंनी यशवंत किल्लेदार यांना एबी फॉर्म दिला. यावेळी मनसेचे नेते बाळा नांदगांवकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, अविनाश अभ्यंकर देखील उपस्थित होते. वॉर्ड क्रमांक 192 मधून यशवंत किल्लेदार उमेदवारी दाखल करणार आहेत.

राज ठाकरेंकडून एबी फॉर्म मिळताच यशवंत किल्लेदार भावूक झाले. माझ्यासाठी भावनिक आणि आनंद गोष्ट आहे. भावनिक झालो आहे, कंठ दाटून आला आहे, असं यशवंत किल्लेदारांनी सांगितले. बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ही पोचपावती मिळाली, असंही यशवंत किल्लेदार म्हणाले.

Leave a Comment