आज वर्षाचा पहिलाच सोमवार, दि. ०५ जानेवारी २०२५ ! भोलेनाथांची कृपा कोना कोना वर होईल, आजचे राशीभविष्य वाचा…

SHARE:

राशींभविष्य – आज ५ जानेवारी २०२६, आजचा वार सोमवार आहे. नुकतंच २०२६  वर्ष सुरू झाले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आज सोमवार दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व १२  राशींच्या लोकांवर दिसून येईल. भोलेनाथांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? १२  राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

मेष रास (Aries)
मेष राशीच्या लोकांनो आज काही जगावेगळ्या भन्नाट कल्पना तुमच्या डोक्यात असतील त्या प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न कराल.

वृषभ रास (Taurus)
वृषभ राशीच्या लोकांनो आज बरोबरच्या लोकांचे सहकार्य उत्तम मिळेल तुमच्या ज्ञानाला धाडसाची जोड मिळेल.

मिथुन रास (Gemini)
मिथुन राशीच्या लोकांनो आज कामाची गती वाढेल प्रत्येक गोष्ट सहजगत्या केल्यामुळे कामातही सहजता येईल.

कर्क रास (Cancer)
कर्क राशीच्या लोकांनो आज महिला अंत स्फूर्तीने काम करतील आर्थिक चणचण थोडी भासेल.

सिंह रास (Leo)
सिंह राशीच्या लोकांसाठी आज स्वतंत्र व्यक्तिमत्व आणि विचारसरणी असा सगळा स्वतंत्र खाक्या राहिल्यामुळे इतरांशी जमणे थोडे अवघड जाईल.

कन्या रास (Virgo)
कन्या राशीच्या लोकांनो आज पैसा हातात पडल्यामुळे जुनी देणे देऊन टाकाल कुटुंबीयांसमवेत प्रवासाला जाण्याचे बेत आखाल.

तूळ रास (Libra)
तूळ राशीच्या लोकांनो आज कुटुंबातील एखाद्या विक्षिप्त स्वभावाच्या माणसाचा थोडा त्रास होईल.

वृश्चिक रास (Scorpio)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज जी गोष्ट करायला हवी ती न केल्यामुळे लाभ मिळण्यामध्ये कमतरता भासेल.

धनु रास (Sagittarius)
धनु राशीच्या लोकांनो आज राजकारणामध्ये असलेल्या लोकांनी आपले पाय रोवण्यासाठी डावपेच खेळायला हरकत नाही.

मकर रास (Capricorn)
मकर राशीच्या लोकांनो आज महिला व्यवहारी बनतील आपला हेका न सोडल्यामुळे मात्र नुकसान होऊ शकते.

कुंभ रास (Aquarius)
कुंभ राशीच्या लोकांनो आज थोडा सारासार विचार करावा लागेल विद्यार्थी वर्ग अभ्यासाबरोबरच इतर गोष्टींमध्ये रस घेतील.

मीन रास (Pisces)
मीन राशीच्या लोकांनो आज एकाग्रता वाढवण्यासाठी थोडी ओंकार साधना उपयोगी पडेल घरामध्ये नवीन विचारांचे स्वागत करायला लागेल.

(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल रयत रक्षक न्यूज कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Leave a Comment

अधिक वाचा