काही लोकं Ai चा वापर करून वाट्टेल ते माझ्या नावानं खपवतायत…’; PMPL वादानंतर अथर्व सुदामेची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?

SHARE:

पुणे – आपल्या हटके रिल्समधून सर्वांचं मनोरंजन करणारा पुण्याचा प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे त्याच्या एका रिलमुळेच वादाच्या भोवऱ्यात अडकलेला. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वतीनं अथर्व सुदामेला याप्रकरणी नोटीस बजावून सात दिवसांच्या आत लेखी खुलासा करुन तो व्हिडीओ सोशल मीडियावरुन तात्काळ हटवण्याचाही इशारा देण्याता आलाय. तसेच, असं न केल्यास याप्रकरणी कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिलेला. अशातच आता अथर्व सुदामेनं याप्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसमध्ये परवानगीशिवाय रील शूट करणं आणि महिला प्रवाशांबद्दल आक्षेपार्ह आशय दाखवल्या ठपका अथर्व सुदामेवर ठेवला आहे. तसेच, PMPML प्रशासनाने त्याला कायदेशीर नोटीस बजावली आहे. यावर आता अथर्वनं मौन सोडलं असून वादावर थेट न बोलताना सोशल मीडियावर सुरू असणाऱ्या चुकीच्या चर्चांवर मौन सोडलं आहे.

रिलस्टार अथर्व सुदामे नेमकं काय म्हणाला?
अथर्व सुदामे आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये म्हणाला की, “नमस्कार बरेचसे न्यूज चॅनेल्स आणि माध्यमं माझं रील न बघता वाट्टेल ते लिहीत आहेत आणि पसरवत आहेत. मी ना कोणाला प्रतिक्रिया दिलीय ना कोणाशी चर्चा केली आहे, तरीही कोणीही काही वाक्य माझा फोटो आणि नाव वापरून पसरवत आहेत. तर काही लोकं Ai चा वापर करून वाट्टेल ते विधान माझ्या नावाने खपवत आहेत त्यामुळं कृपया अशा कुठल्याही फेक न्यूजवर विश्वास ठेऊ नका. मला जर काही बोलायचं असेल तर ते मी माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलीन…”

नेमकं घडलं काय?
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वतीनं अथर्वला शुक्रवारी नोटीस बजावण्यात आली असून येत्या सात दिवसांच्या आत लेखी खुलासा सादर करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, समाजमाध्यमांवरुन संबंधित व्हिडीओ तात्काळ हटवावा, नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरं जावं, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. नोटीशीत नमूद केल्यानुसार, अथर्व सुदामेच्या व्हिडीओमुळे पीएमपीची प्रतिमा मलीन होत आहे. समाजमाध्यमावरील चित्रीकरण न हटवल्यास कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल, अशा इशारा पीएमपीच्या मुख्य कार्यालयाकडून अथर्व सुदामेला देण्यात आला आहे.

Leave a Comment

अधिक वाचा