अशोक सराफ यांच्या ‘साडे माडे तीन’ चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत…

SHARE:

मनोरंजन विश्व् – मराठी प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी. लवकरच रतन, मदन आणि चंदन ही तिहेरी जोडी पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर कल्ला करण्यास सज्ज झाली आहे. ‘साडे माडे तीन’ या चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘पुन्हा साडे माडे तीन’ या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेता अशोक सराफ, मकरंद अनासपुरे आणि भरत जाधव या तिघांची जोडी एकत्र पाहायला मिळणार आहे. पण या चित्रपटात एक मोठा ट्विस्ट असणार आहे. कारण त्यांच्या आयुष्यात कामिनीची एन्ट्री होते. कामिनीच्या येण्याने तिघांच्या आयुष्यात नक्की काय बदल होतो? हे रूपेरी पडद्यावर पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. खळखळून हसवणाऱ्या कॉमेडी फिल्मची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

‘पुन्हा साडे माडे तीन’ या चित्रपटाचा नुकताच धमाकेदार टीझर प्रदर्शित झाला. या चित्रपटात अशोक सराफ, मकरंद अनासपुरे आणि भरत जाधव, रतन,मदन आणि चंदन यांची भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटात कामिनीची भूमिका अभिनेत्री रिंकु राजगुरू साकारणार आहे. ती कुरळे ब्रदर्सच्या गँगमध्ये सामील होते. तिन्ही भाऊ हे शिस्तप्रिय. पण त्यांच्यात कामिनीची एन्ट्री झाल्यामुळे तिघांमध्ये एकच गोंधळ उडतो. या चोघांची केमिस्ट्री रूपेरी पडद्यावर कशी दिसेल? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

या चित्रपटाच्या टीझरची सुरूवात रिंकु राजगुरूच्या आवाजाने होतो. अशोक सराफ, मकरंद अनासपुरे आणि भरत जाधव यांची एन्ट्री होते. नंतर टीझरमध्ये रिंकू राजगुरूची एन्ट्री होते. या चित्रपटाच्या टीझरमधून डबल गोंधळ आणि डबल कॉमेडी पाहायला मिळणार एवढं मात्र नक्की. या भन्नाट चित्रपटाचे दिग्दर्शन अंकुश चौधरी यांनी केले आहे. तसेच उषा काकडे, पुष्कर यावलकर, सुधीर कोलते, स्वाती खोपकर आणि निनाद बत्तीन हे निर्माते आहेत. तर, मोहसिन खान, यशराज टिळेकर, सौरभ ललवाणी आणि धनविक एंटरटेनमेंट सहनिर्माते आहेत. तर, स्मिथ पीटर तेलगोटे सहाय्यक निर्माता आहे.

या चित्रपटाच्या प्रमुख भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, भरत जाधव आणि रिंकू राजगुरू झळकणार आहे. तसेच संकेत पाठक, समृद्धी केळकर आणि संजय नार्वेकर यांच्या देखील प्रमुख भूमिकेत आहे. हा चित्रपट 30 जानेवारी 2026 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपटाची प्रेक्षकवर्ग आतुरतेने वाट पाहत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा