पंजाब राज्यामध्ये आम आदमी पार्टीच्या, नेत्याची डोक्यात गोळी झाडून हत्या…

SHARE:

अमृतसर – पंजाब राज्यामध्ये आम आदमी पार्टीच्या, नेत्याची डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. पंजाब राज्यातील अमृतसरमध्ये, लग्नमंडपात घुसून ’आप’ नेत्याची डोक्यात गोळी झाडून हत्या केली आहे व काही वेळातच आरोपी फरार झाले आहेत. पंजाब राज्यामध्ये गुन्हेगारांचे मनोबल किती वाढले आहे, याचा प्रत्यय देणारी एक धक्कादायक घटना अमृतसरमध्ये घडली आहे. आम आदमी पार्टीचे सरपंच झरमल सिंग, यांची एका लग्न समारंभात घुसून हत्या करण्यात आली आहे. आता या घटनेचे अत्यंत भयानक सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, पंजाब राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या खळबळजनक हत्येची जबाबदारी कुख्यात गँगस्टर डोनी बल, प्रभ दासुवाल आणि देवेंद्र बंबीहा ग्रुपने घेतली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी या कृत्याची कबुली दिल्याचे समजते आहे. पंजाब राज्यात गँगस्टर राजवटीमुळे , पंजाबमधील सामान्य जनता आणि लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पंजाब राज्यातील हत्याकांडातील समोर आलेल्या फुटेजमध्ये दिसते की, आम आदमी पार्टीचे ,सरपंच झरमल सिंग लग्नात एका टेबलवर निवांत बसलेले आहेत. त्याच वेळी दोन सशस्त्र तरुण तिथे पोहोचतात. काहीही समजण्यापूर्वीच ते अत्यंत जवळून झरमल सिंग यांच्यावर गोळया झाडतात. गोळी लागताच सिंग खाली कोसळतात आणि हल्लेखोर शस्त्रांसह आरामात तिथून पसार होतात. ही संपूर्ण घटना काही सेकंदात घडली असून, तिथे उपस्थित पाहुणेही स्तब्ध झाले होते. आप सरपंचाच्या हत्येनंतर सुखबीर सिंग बादलांनी, पंजाब सरकारवर संताप व्यक्त केला आहे.

पंजाब राज्यामधील शिरोमणी अकाली दलाचे नेते , सुखबीर सिंग बादल यांनी पंजाब सरकारला धारेवर धरले आहे. “पंजाबमध्ये सध्या सार्वजनिक ठिकाणी, हत्या होणे ही सामान्य बाब झाली आहे,“ अशा शब्दांत त्यांनी आपला संताप पंजाब सरकारविरोधात व्यक्त केला आहे. बादल यांनी व्टिटरच्या माध्यमातून पंजाब राज्यातील सरकारवर टीका केली आहे. आम आदमी पार्टीचे “सरपंच झरमल सिंग यांची हत्या ही एक अत्यंत चिंताजनक घटना आहे. पंजाबमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रक्ताचा खेळ सुरू आहे. काल मोगामध्ये एका तरुणाची गोळी मारून हत्या करण्यात आली, तर कपूरथला येथे एका महिलेला लक्ष्य करण्यात आले. पंजाब राज्यात ’टार्गेट किलिंग’चे सत्र सुरू असून राज्यातील जनता असुरक्षित आहे,“ असे बांदल यांनी म्हटले आहे. या परिस्थितीला पंजाबचे, मुख्यमंत्री भगवंत मान जबाबदार असल्याचा आरोप बांदल यांनी केला आहे. “पंजाबचे गृह मंत्रालय स्वतः मुख्यमंत्र्यांकडे आहे, तरीही पंजाब राज्यातील पोलीस यंत्रणा गुन्हेगारांना रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरली आहे. राज्यात सार्वजनिक ठिकाणी दिवसाढवळया होणाऱया या हत्या, पंजाब पोलीस प्रशासनाच्या अपयशाचे चित्र आहे. या प्रत्येक रक्ताच्या थेंबाला आणि राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या बिघडलेल्या अवस्थेला पंजाबचे मुख्यमंत्री जबाबदार आहेत,“ अशी टीका बांदल यांनी आप सरकारवर केली आहे.

अमृतसरमधील ’मॅरी गोल्ड रिसॉर्ट’ मध्ये आम आदमी पार्टीचे सरपंच, झरमल सिंग यांची करण्यात आलेली हत्या, ही पूर्ववैमनस्यातून आणि सूडबुद्धीने केल्याचे आता स्पष्ट होत आहे. या हत्येचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, त्यात हल्लेखोरांनी सरपंचांच्या अत्यंत जवळ जाऊन, त्यांच्यावर गोळया झाडल्याचे दिसत आहे. मात्र, या घटनेनंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या, एका पोस्टने पोलीस प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. सरपंच झरमल सिंग यांच्या हत्येनंतर, गँगस्टर डोनी बल याच्या नावाने एक पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये हत्येची जबाबदारी स्वीकारताना म्हटले आहे की, या सरपंचाने पोलिसांना ३५ लाख रुपये दिले होते आणि पोलिसांना सोबत घेऊन तो दासुवालमधील माझे घर पाडण्यासाठी आला होता. त्याच गोष्टीचा हा बदला आहे.“

गँगस्टर्सनी पोलिसांनाही धमकीवजा इशारा दिला आहे. “आमच्या या कृत्यामुळे पंजाब पोलिसांनी इतर कोणाही निष्पाप व्यक्तीला बेकायदेशीरपणे त्रास देऊ नये,“ असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. पंजाबमधील ही हत्या केवळ गँगवॉर नसून, त्याला वैयक्तिक वादाची आणि प्रशासकीय कारवाईची बदला घेतला आहे. मिळालेल्या फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की, सरपंच झरमल सिंग लग्नात बसलेले असताना हल्लेखोर त्यांच्या अगदी जवळ पोहोचले. कोणतीही चर्चा न करता थेट डोक्यात गोळया झाडून त्यांना मारले आहे. अत्यंत थंड डोक्याने आणि नियोजनबद्ध पद्धतीने हा खून करण्यात आल्याचे फुटेजवरून स्पष्ट होत आहे, असे पंजाब पोलिसांनी म्हटले आहे, आणि या घटनेचा अधिक तपास पंजाब पोलिस करत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा