देशभरातील बँक कर्मचारी संप करणार, ५ दिवस बँक व्यवहार पूर्णपणे ठप्प होणार…

SHARE:

नवी दिल्ली – देशभरातील बँक कर्मचारी संप करणार आहेत, तर यामूळे देशात ५ दिवस बँकेचे व्यवहार पूर्णपणे ठप्प होणारआहेत, असे देशातील युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने म्हटले आहे. देशातील सर्व बँक कर्मचारी पाच दिवस संपावर जाणार आहेत. तर देशातील सर्व व्यवहार पूर्णपणे ठप्प होण्याची भीती आहे. सार्वजनिक २  सुट्टया आणि त्यानंतर ३  दिवसांचा संप ,असे मिळून सलग ५  दिवस देशातील बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत.

देशातील बँक कर्मचाऱी व अधिकारी यांच्या प्रलंबित मागण्यांकडे देशातील केंद्र सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत, युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने २७  जानेवारी २०२६  रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. ५  दिवसांचा आठवडा बँकांसाठी लागू करावा, हे त्यांचे मुख्य मागणी आहे. जर देशातील बँक कर्मचारी संप यशस्वी झाला, तर सलग ५  दिवस बँकांचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे. जानेवारी २०२६  च्या महिन्यात २५  तारखेला रविवार आणि २६  जानेवारीला प्रजासत्ताक दिनाची सार्वजनिक सुट्टी आहे. त्यानंतर लगेच २७  तारखेला देशातील बँक कर्मचारी यांनी संपाचा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रत्यक्षात ३  दिवसांचा संप असला तरी २६ जानेवारी आणि २६  जानेवारीच्या सुट्टी पकडून सलग ५  दिवस बँका बंद राहू शकतात. यामुळे देशभरातील चेक क्लिअरन्स, रोख व्यवहार आणि इतर वित्तीय कामांवर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

देशात २५  जानेवारी २०२६  रविवार आणि 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाची सार्वजनिक सुटी आहे. त्यानंतर २७  तारखेला देशव्यापी संपाची घोषणा करण्यात आली आहे, ज्यामुळे देशातील बँकांचे कामकाज सलग ५  दिवस बंद राहू शकते. यामुळे चेक क्लिअरन्स, रोख व्यवहार, आणि इतर वित्तीय कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. हा देशातील बँक कर्मचारी संप जास्त दिवस झाल्यास, मोठ्या प्रमाणात देशातील नागरिकांना त्रास होऊ शकतो. देशातील बँक व्यवहार पूर्णपणे ठप्प होण्याची भीती आहे.

देशभरातील बँक कर्मचारी यांना प्रत्येक महिन्याच्या दुसऱया आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असते. मग तरी अजून कोणत्या सुट्ट्या अपेक्षित आहेत, असा प्रश्न देशातील सर्वसामान्य लोकांना पडू शकतो. तर देशातील बँक कर्मचारी संघटना उर्वरित २ शनिवारी देखील सुटी मिळावी, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून देशभरातील बँक कर्मचारी करत आहेत. म्हणजेच बँक कर्मचा़री यांना आठवड्याचे ५ दिवस काम आणि प्रत्येक शनिवार रविवार सुट्टी हवी आहे. देशात मार्च २०२४  मध्ये झालेल्या वेतन करारात ’आयबीए’ आणि ’यूएफबीयू’ यांच्यात या मागणीवर सहमती झाली होती. मात्र, देशातील केंद्र सरकारकडून अद्याप या बाबत अंतिम निर्णय घेतलेला नाही. त्यामूळे देशातील बँक कर्मचारी संप करणार आहेत, असे युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने म्हटले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा