मुंबई – मुंबई महापालिका निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने, ठाकरेगट शिवसेनेचे माजी आमदार नाराज झाले आहेत. मुंबईत महापालिका निवडणुकीत, ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार आणि पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख दगडू सकपाळ यांच्या मुलीला उमेदवारी दिली नाही, शिवसेना पक्षाला आपली गरज संपली आहे, असे म्हणत ठाकरेंचे माजी आमदार नाराज झाले आहेत. तर याप्रकरणात शिंदेंगट शिवसेनेनेनी मध्यरात्रीच ठाकरेंच्या माजी आमदाराची भेट घेतली आहे, अशी माहिती मिळाली आहे. सध्या तरी दुसऱ्या पक्षात जाणार नाही, पण कुणाला गरज वाटलीच तर विचार करू असे, ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार दगडू सपकाळ म्हणाले आहेत. एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
राज्यात महापालिका निवडणुका तोंडावर असताना ठाकरेंच्या शिवसेनेला, धक्कयावर धक्के बसताना दिसत आहेत. अशातच ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार आणि पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख दगडू सकपाळ यांची, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री भेट घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत मुलीला उमेदवारी मिळाली नसल्याने, ठाकरेंचे शिवसेना आमदार दगडू सकपाळ नाराज असल्याची माहिती आहे. त्यातच आता मतदान अवघ्या काही दिवसांवर असताना,एकनाथ शिंदेंच्या भेटीमुळे राजकीय चर्चा होत आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, माजी आमदार दगडू सकपाळ यांची भेट घेतल्यामुळे, अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत. दगडू सकपाळ यांची मुलगी रेश्मा सकपाळ या वॉर्ड क्रमांक 203 मधून ठाकरे गटाकडून मुंबई महापालिका निवडणूक लढवण्यास इच्छुक होत्या. मात्र पक्षाने रेश्मा सकपाळ यांना उमेदवारी नाकारून भारती पेडणेकर यांना, उमेदवारी दिल्याने दगडू सकपाळ नाराज आहेत अशी चर्चा सुरू आहे. मात्र आपल्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी एकनाथ शिंदे आले होते, दुसरे तिसरे काहीही नाही, असे स्पष्टीकरण शिवसेना माजी आमदार दगडू सकपाळ यांनी दिले आहे.
मुंबईत ठाकरे शिवसेनेला वा ’पक्षाला आमची गरज संपली’ आहे ,असे वाटत आहे. शिवसेनेचे माजी आमदार दगडू सकपाळ म्हणाले की, मुंबईत “जोपर्यंत गरज होती तोपर्यंत पक्षासाठी काम केले आहे. आता गरज पक्षाला गरज संपली, पक्षाकडून विचारणाही होत नाही. एक फोन जरी आला असता तरी, समाधान होते. मात्र शिवसेना पक्षाकडून विचारणाच होत नसेल तर घरी बसलेले बरे. मी आजारी आहे हे एकनाथ शिंदेंना कोणीतरी सांगितले, तेव्हा ते भेटीसाठी आले. सोबत राणेंचे चिरंजीव, देवरांचे चिरंजीव होते, असे ठाकरे गट शिवसेनेचे माजी आमदार दगडू सकपाळ म्हणाले आहेत.
माजी आमदार दगडू सकपाळ म्हणाले की, “मी पक्षात नाराज आहे नक्की, पण मातोश्रीबाबत काहीही बोलणार नाही. जो काही आहे, जे काही मिळाले ते त्यांच्यामुळेच. मी फक्त मुलीसाठी एक जागा मागितली होती. पवारांच्या राष्ट्रवादीला 11 जागा दिल्या, त्यांनी कधी पक्षासाठी रक्त सांडले आहे का? अशी खंत शिवसेनेचे नेते माजी आमदार दगडू सकपाळ यांनी बोलून दाखवली आहे. तसेच अजून कुठे दुसरीकडे जाण्याचा विचार नाही केला, पण कुणाला गरज वाटली तर, पुढे विचार करू असा ठाकरे शिवसेनेला इशाराही शिवसेना माजी आमदार दगडू सकपाळ यांनी दिला आहे. राज्यातील महानगरपालिका जवळ असताना मुंबईत ठाकरे शिवसेनेत अंतर्गत वाद अजुन सुरूच आहेत. राज्यात महानगरपालिका निवडणुकांमूळे सर्व राजकीय पक्षांत बंडखोरी सुरू आहे, आणि राज्यातील काही राजकीय पक्षांत अंतर्गत वादामूळे गुन्हेगारी घटनाही वाढल्या आहेत.




