फरिदाबाद – दिल्लीत राष्ट्रीय नेमबाज प्रशिक्षक अंकुश भारद्वाजवर, अल्पवयीन तरुणीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. खेळासंदर्भातील चर्चा करण्यासाठी तिला प्रशिक्षकांनी थांबवून ठेवत, शेवटी स्वतःच्या हॉटेल रुममध्ये राष्ट्रीय नेमबाजी प्रशिक्षक अंकुश भारद्वाजने बोलावलं, आणि भारद्वाजने माझा लैंगिक छळ केला आहे. पुढे काय झालं तिने सविस्तरपणे तक्रारीत सांगितले आहे. पाठ दाबून देण्यास नकार दिल्याने ,’भारद्वाजने माझा लैंगिक छळ केल्याचा १७ वर्षीय मुलीने गंभीर आरोप केला आहे. पीडितेने जबाबामध्ये माहिती दिली आहे.
नॅशनल रायफल्स असोसिएशन ऑफ इंडियानेही प्रतिक्रिया नोंदवली आहे. राष्ट्रीय नेमबाजी प्रशिक्षक अंकुश भारद्वाजवर गंभीर आरोप करण्यात आला आहे. भारद्वाजने माझा लैंगिक छळ केल्याचा आरोप एका अल्पवयीन नेमबाज मुलीने केला आहे. या आरोपांनंतर नॅशनल रायफल्स असोसिएशन ऑफ इंडियाने एनआरएआयने भारद्वाजला तत्काळ निलंबित केले आहे. आरोप करणारी तरुणी १७ वर्षांची आहे.
एनआरएआयने सांगितले आहे, राष्ट्रीय स्तरावर खेळणारी ही १७ वर्षीय नेमबाज मुलगी ऑगस्ट २०२५ पासून भारद्वाजकडे प्रशिक्षण घेत होती. फरिदाबादमधील एका हॉटेलमध्ये प्रशिक्षकाने माझ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. स्पर्धेतील कामगिरीचा आढावा घेण्यासाठी डिसेंबर २०२५ मध्ये भारद्वाजने हॉटेलच्या रुममध्ये भेटण्यासाठी बोलावले होते. प्रशिक्षकाने तिच्यावर दबाव आणल्याचा आरोपही करण्यात आला आहे. अंकुश भारद्वाज यांना नैतिक कारणांवरून निलंबित करण्यात आले आहे. आता त्यांना स्वतःला निर्दोष सिद्ध करावे लागेल. चौकशी पूर्ण होईपर्यंत, ते कोणत्याही प्रशिक्षण कार्यात सहभागी होणार नाहीत,“ असे एनआरएआयचे सचिव राजीव भाटिया यांनी सांगितले.
भारद्वाज यांनी खेळाचं विश्लेषण करण्याच्या बहाण्याने, एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बोलावून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. जेव्हा तिने याला विरोध केला, तेव्हा तिच्या प्रशिक्षकाने, ’तू जर याबद्दल कोणाला काही सांगितले तर तुझे करिअर उद्ध्वस्त करेन,“ अशी धमकी दिल्याचाही आरोप पाडितेने केला आहे.या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार, ही घटना १६ डिसेंबर रोजी घडली. दक्षिण दिल्लीतील तुघलकाबाद येथील डॉ. करणी सिंग शूटिंग रेंजमध्ये राष्ट्रीय स्तरावरील नेमबाजी स्पर्धेत पीडिता सहभागी झाली होती तोच हा कालावधी होता.
आपल्या तक्रारीत, त्या अल्पवयीन मुलीने पोलिसांना सांगितले की, ती २०१७ पासून नेमबाजीचे प्रशिक्षण घेत आहे आणि गेल्या वर्षी तिने भारद्वाज यांच्याकडे प्रशिक्षण सुरू केले. तिच्या स्पर्धांसाठी ती अनेक शहरांमध्ये गेली होती. गेल्या वर्षी १६ डिसेंबर रोजी एका स्पर्धेसाठी ती दिल्लीत होती. स्पर्धा संपल्यानंतर डॉ. करणी सिंग शूटिंग रेंजमधून निघण्याच्या तयारीत असताना, भारद्वाजने तिला रेंजवर थांबायला सांगितले. तिच्या ’कामगिरी’वर चर्चा करण्याच्या उद्देशाने थांबवण्यात आल्याचं सांगितलं गेले.
पीडित तरुणी फरिदाबादमधील हॉटेलच्या लॉबीमध्ये प्रशिक्षकाची वाट पाहत थांबलेली असताना, तिच्या प्रशिक्षकाने तिला आपल्या खोलीत बोलावले. पीडितेने केलेल्या तक्रारीनुसार, हॉटेल रुममध्ये गेल्यावर ती खुर्चीवर बसलेली असताना भारद्वाज यांनी तिला ’पाठ दाबून’ देण्याची ऑफर दिली. जेव्हा तिने नकार दिला. तेव्हा प्रशिक्षकाने जबरदस्तीने माझ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.
लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रशिक्षकाला या मुलीने मागे ढकलले, तेव्हा प्रशिक्षकाने तिला, ’तुझे करिअर उद्ध्वस्त करेन,’ अशी धमकी दिली. तिच्यावर जबरदस्ती केल्यानंतर त्याने तिला घरीही सोडले. “मी घाबरले होते आणि मी कोणालाही काही सांगितले नाही. अंकुश भारद्वाज सरांनी माझ्या पालकांकडे तक्रार केली की, मी त्यांचे ऐकत नाही. माझी आई त्या रात्री घरी पोहचल्यानंतर, मला ओरडली. मला रात्रभर झोप लागली नाही, जेव्हा माझ्या आईने मला विचारले की, मी तणावात का आहे, तेव्हा मी तिला सर्व काही सांगितल,े आणि ती मला पोलीस ठाण्यात घेऊन आली,“ असे त्या मुलीने जबाबात सांगितले आहे.
आधीही हा प्रशिक्षक वादात सापडला आहे. पिस्तूल नेमबाज असलेले भारद्वाज वादात सापडल्याची ही पहिलीच वेळ नाही. ते सक्रीय खेळाडू असलेल्या कालावधीत, त्यांच्यावर बीटा-ब्लॉकर औषधाच्या वापरासाठी २०१० मध्ये उत्तेजक द्रव्य सेवन बंदीची, कारवाई करण्यात आली होती. देशात आजही मूली सुरक्षित नाही , हे फरिदाबादमधील घटनेने दिसुन येत आहे.




