सत्ताधारी पक्षाकडून सातत्याने संविधानाची गळचेपी करण्याचा प्रयत्न, राधिका देशमुख यांचा निशाना

SHARE:

अमरावती – सत्ताधारी पक्षाकडून सातत्याने संविधानाची गळचेपी करण्याचा प्रयत्न होत आहे, अशा शब्दात सामाजिक कार्यकर्त्या राधिका देशमुख यांनी नाव न घेता भाजपवर निशाना साधला. त्या अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे बुद्धिष्ठ इंटरनॅशनल नेटवर्क या संघटनेद्वारे भदंत आनंद कौसल्यायन यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एक दिवसिय धम्म परिषदेत बोलत होत्या.

राधिका देशमुख पुढे म्हणाल्या कि आज आपण अशा स्थितीत आहोत कि आपल्याला संविधानाचे रक्षण करणे महत्वाचे आहे. संविधानाने दिलेले अधिकार वाचवण्यासाठी आपल्याला एकत्र येणे गरजेचे आहे. संविधान एक पुस्तक नसून आपले अधिकार, मुल्ये, विचार आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शतकांनुशतके गुलामगिरीत फसलेल्या, ज्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता, अशा सर्व लोकांना बाबासाहेब आंबेडकर यांनी अधिकार दिलेले आहेत.
बाबासाहेबांनी एससी, एसटी आणि ओबीसींना शिक्षण आणि नोकरीत आरक्षण दिले. इतकेच नाही तर त्यांनी संविधानात तरतूद करून अस्पृश्यता नष्ट केली. तसेच ॲट्रॉसिटी कायद्यामुळे आपल्याला सन्मानाने जगण्याचे कवच मिळाले.

बाबासाहेबांनी कलम ३४०  च्या माध्यमातून मंडल आयोग स्थापन करण्याची तरतूद केली. यामुळे ओबीसी बांधवाना सत्ता, शिक्षण आणि नौकरीत वाटा मिळाला. अनुच्छेद 19 मध्ये अल्पसंख्याक समुदायाला आपली, संस्कृती, भाषा, संस्था, परंपरा जतन करण्याचा मूलभूत अधिकार मिळाला, असेही त्या म्हणाल्या.

राधिका देशमुख म्हणाल्या कि सध्या कुठल्याही माध्यमातून संविधानाची गळचेपी करण्याचा प्रयत्न सातत्याने सत्ताधारी पक्षाकडून होत आहे. यामुळे आपलं नुकसान होत आहे. सरकारने खाजगीकरणाचा सपाटा लावला. यामुळे बाबासाहेबांनी नौकरीत दिलेलं आरक्षण समाप्त होत आहे. वंचित समुदायाच्या कल्याणासाठी येणार्या निधीमध्ये सुद्धा कपात केली जात आहे. ही भारताच्या लोकशाहीची गळचेपी आहे. जर आपल्याला या विरोधात लढायचं असेल तर एससी, एसटी, ओबीसींनी आपआपले मतभेद विसरून लोकशाहीच्या मार्गाने आणि संविधानाच्या वाटने रस्त्यांवर उतरे प्रचंड गरजेचे झाले आहे, असी आशा त्यांनी व्यक्त केली.

संविधान वाचवणे म्हणजे एक पुस्तक वाचवणे नाही आहे तर येणार्या पिढीचं भविष्य सुरक्षित करणे होय. यासाठी आम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शिका, संगठित व्हा आणि संघर्ष करा, हा मंत्र अंमलात आणावा लागेल. येथे बसलेल्या प्रत्येकाला संविधान रक्षक म्हणून पुढे येणे गरजेचे आहे. संविधान टीकले तर आपला सन्मानही टीकेल, असे म्हणत राधिका देशमुख यांनी संविधान वाचवण्याचे आवाहन उपस्थित समुदायाला केले.

Leave a Comment

अधिक वाचा