‘ओ रोमिओ’ टीझर : रक्ताने माखलेला चेहरा, भयानक हास्य…शाहिद कपूरचा खूंखार अवतार धडकी भरवणारा, टिझर पाहिलात?

SHARE:

मनोरंजन विश्व : नव्या वर्षाची सुरुवात मनोरंजन विश्वात धमाकेदार झाली आहे. यंदा बॉक्स ऑफिस गाजवण्यासाठी अनेक मोठे आणि बहुप्रतिक्षित चित्रपट सज्ज आहेत. अभिनेता शाहिद कपूरच्या ‘ ओ रोमीओ’ या चित्रपटाची अनेक दिवसांपासून चर्चा आहे. अलीकडेच या चित्रपटाचे जबरदस्त पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. रक्ताने माखलेला चेहरा, अंगभर टॅटू, आणि भयानक हास्य अशा अवतरात अभिनेता शाहिद कपूरचा भयानक लुक बघून चाहत्यांना या सिनेमाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. २०२६ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा टिझर आता समोर आला आहे.

विशाल भारद्वाज दिग्दर्शित हा चित्रपट प्रचंड मोठा बॉलिवूड हिट मानला जातोय. साजिद नाडिया वाला याने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात शाहिद कपूरसोबत अभिनेत्री तृप्ती डीमरी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय नाना पाटेकरांसारखा शक्तिशाली कलाकारही या सिनेमात असल्याने चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे.

पहिल्या लुकनंतर टिझरही आला समोर
अलीकडेच अभिनेता शाहिद कपूरने त्याच्या सोशल मीडियावर ओ रोमिओ चित्रपटातील त्याची पहिली झलक दाखवली. यात त्याचा भयानक लूक बघून चाहतेही हादरले आहेत. प्रचंड हिंस्र अवतारात तो दिसतोय. माफीयांच्या विश्वातली ही कथा प्रेम, शत्रुत्व आणि ॲक्शन आणि थ्री देणारी असल्याचं लगेच कळतंय. या टिझरमध्ये अभिनेता शाहिद कपूर अंगभर टॅटू हातात बंदूक आणि जबरदस्त ऍक्शन करताना दिसतोय. तृप्ती डिमरीची ही आगळी वेगळी झलक टिझरमध्ये दिसते. १  मिनिट ३५ सेकंदाच्या या टिझरमध्ये इतर कलाकारांची ही झलक दाखवण्यात आली आहे. नाना पाटेकर विक्रांत मेस्सी दिशा पटानी तमन्ना भाटिया अविनाश तिवारी फरीदा जलाल आणि शेवटी तृप्ती डीमरी दिसते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor)

काय आहे प्रदर्शनाची तारीख?
‘ओ रोमिओ’ हा चित्रपट आधी ५  डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र नंतर प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली. आता हा चित्रपट १३ फेब्रुवारी २०२६ रोजी म्हणजेच ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या आदल्या दिवशी चित्रपटगृहांमध्ये धडाकेबाज एन्ट्री मरणार आहे.

शाहिद आणि विशाल भारद्वाज यांचा हा चौथा चित्रपट आहे. यादी दोघांनी कमीने हैदर आणि रंगून हे तीन चित्रपट एकत्र केले आहेत. यापैकी कमी नाही आणि हैदर बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाले. गेल्या तीनही चित्रपटांमध्ये विशाल भारद्वाजी यांनी शाहीदला पूर्णपणे वेगळ्या शैलीत दाखवला आहे. रोमिओ मधील त्याचा लुक बघून चहात्यांनाही अंगावर शहारे येतील हे नक्की.

Leave a Comment

अधिक वाचा