बिहार राज्यामध्ये ज्वेलरीच्या दुकानांमध्ये, चेहरा झाकलेल्या ग्राहकांना प्रवेश नाकरला जाणार

SHARE:

पाटणा – बिहार राज्यामध्ये ज्वेलरीच्या दुकानांमध्ये, चेहरा झाकून जाणार्या ग्राहकांना प्रवेश नाकरला जाणार आहे. बिहारमध्ये चेहरा झाकलेल्या लोकांना ज्वेलर्सच्या दुकानात बंदी घातली आहे. राज्यभर हा निर्णय लागू होणार आहे. बिहार राज्यातील सत्ताधाऱी पार्टीने ही समर्थन दिले आहे. यासंदर्भातील निर्णय एका मोठ्या बैठकीनंतर घेण्यात आला आहे. राज्यात हा निर्णय समोर आल्यावर, आता या विषयावरुन राजकीय वाद निर्माण झाला आहे. बिहार राज्यातील विरोधी पक्षांचा या निर्णयाला विरोध असून, सत्ताधारी भाजपाने मात्र समर्थन केले आहे.

बिहार राज्यात ज्वेलरीच्या दुकानांमध्ये, चेहरा झाकून जाणार्या ग्राहकांना प्रवेश नाकारला,या विषयावरून नवीन राजकीय वाद निर्माण झाला आहे. राज्यात ज्वेलर्सचा नवा नियम लागु होणार आहे. संपूर्ण राज्यात हा नियम लागू होणार आहे. या विषयावर बिहारमध्ये राजकारण तापले आहे.

राज्यात यापुढे ज्वेलरीच्या दुकानांमध्ये चेहरा झाकून जाणाऱ्या ग्राहकांना प्रवेश नाकरला जाणार आहे. म्हणजेच हिजाब, बुर्खा, चेहऱ्यावर पदर घेतलेल्या महिलांबरोबरच मास्क, हेल्मेट, मुखवटा घालून येणाऱ्यांनाही यापुढे दागिन्यांच्या दुकानात प्रवेश नसेल. ऑल इंडिया ज्वेलर्स गोल्डस्मिथ फेडरेशनच्या बिहार विभागाने हा निर्णय घेतला आहे. सुरक्षेचे कारण पुढे देत हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले गेले आहे. मात्र आता यावरुन बिहारमधील राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. तर विरोधी पक्षात असलेल्या राष्ट्रीय जनता दल म्हणजेच आरजेडीने याला विरोध केला आहे.

राज्यातील सर्व जिल्हाप्रमुखांची घेतली बैठक झाली आहे. ऑल इंडिया ज्वेलर्स गोल्डस्मिथ फेडरेशनचे बिहारचे अध्यक्ष अशोक वर्मा यांनी, बिहारमधील सर्व जिल्ह्यांमधील अध्यक्षांची भेट घेतली. याच बैठकीमध्ये कोणतीही व्यक्ती चेहरा झाकून दुकानात प्रवेश करणार असेल, तर तिला प्रवेश न देण्याचे ठरले आहे. या प्रकरणावरुन राजकारण होत असल्याचे समोर आल्यानंतर अशोक वर्मा यांनी नवे पत्रक जारी करुन सर्व ज्वेलर्सला चेहरा झाकून आलेल्या व्यक्तीला दुकानात प्रवेश देऊ नये. त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हिजाब, मास्क, मुखवटा, हेल्मेटसारख्या गोष्टी काढूनच त्यांना प्रवेश द्यावा, असे म्हटले आहे.

या निर्णयाचा राज्यात त्वरित परिणामही दिसू लागला आहे. ज्वेलर्सच्या दुकानांमध्ये मोठ्याप्रमाणात चोऱ्या होऊ लागल्या आहेत. त्या रोखण्यासाठीच असोसिएशनने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे. यासंदर्भातील माहिती पोलिसांनाही देण्यात आलेली आहे. बिहारची राजधानी पाटणा येथे या नियमांची अंमलबजावणीही सुरु झाली आहे. हिजाब, मास्क, मुखवटा, हेल्मेट घातलेल्या व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही, अशा नोटीसा दुकानांबाहेर लागल्याचे पाहायला मिळत आहे.

राज्यात सोन्याचांदीच्या दुकानात हिजाब, मास्क, मुखवटा, हेल्मेट घातलेल्या व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही, या विषयावरून राज्यातील विरोधक आक्रमक झाले आहेत. आरजेडीचे प्रवक्ते एजाज अहमद यांनी बुधवारी यासंदर्भात एक पत्रक जारी केले आहे. तर हा निर्णय भारताचे संविधान आणि त्यासंदर्भातील परंपरांच्या पूर्णपणे विरोधात आहे. सुरक्षेच्या नावाखाली हिजाब आणि चेहरा झाकण्याच्या पद्धतीला विरोध करणे, चुकीचे असून यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत, असे अहमद म्हणाले. त्यांनी हा निर्णय तातडीने मागे घ्यावा अशी मागणी केली आहे.

राज्यातील सत्ताधारी भाजपाने समर्थन केले आहे. दुसरीकडे भाजपाचे प्रवक्ते नीरज कुमार यांनी, हा निर्णय एखाद्या विशिष्ट धर्माविरोधात नाही असे म्हणत, या निर्णयाची पाठराखण केली आहे. सोन्या-चांदीचे दर मागील काही काळात, मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे सोन्या-चांदीच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ, झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच या निर्णयाच्या माध्यमातून चेहरा झाकून कोणत्याही महिला अथवा पुरुषाने, दुकानात घुसू नये इतकाच असल्याचे भाजपा नेता म्हणाला.

या विषयाला धार्मिक रंग देऊ नका असे भाजपा प्रवक्तयांनी म्हटले आहे. हा निर्णय कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्यासाठी घेण्यात आलेला नाही. केवळ दुकानांच्या सुरक्षेच्या दृष्टीने, हा निर्णय घेण्यात आला असल्याचे भाजपाने आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा