मुंबई – डॉ. संग्राम पाटलांची विमानतळावर अटक, ही भाजपा सरकारच्या डरपोकपणाचे जीवंत उदाहरण आहे, असे काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी म्हटले आहे. प्रधानमंत्री मोदींविरोधात पोस्ट केल्यामूळे, लंडनवरुन येताच मुंबई विमानतळावर डॉ. संग्राम पाटलांना अटक करून 15 तास चौकशी करण्यात आल्याचा प्रकार मुंबईत घडला आहे. डॉ. संग्राम पाटील हे प्रसिद्ध यूट्यूबर आणि लेखक-व्याख्याते असल्याची माहिती आहे. सोशल मीडियावरुन ते मोठ्या प्रमाणात त्यांची मते मांडतात.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह टीका केल्याचा ठपका ठेवत, भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक डॉ. संग्राम पाटील यांची मुंबई गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली. शनिवारी पहाटे त्यांना मुंबई विमानतळावरुन ताब्यात घेण्यात आले होते. संग्राम पाटील यांची, १५ तासांनंतर मुंबई पोलिसांनी सुटका केल्याची माहिती आहे. मुंबई पोलिसांनी केलेल्या या कारवाईवर, राज्यातील विरोधी पक्षांकडून जोरदार टीका केली जात आहे.
डॉ. संग्राम पाटील हे केवळ युकेचे नागरिक असल्याने मुंबई पोलीस त्यांना अटक करू शकले नाहीत, अशी माहिती आहे. चौकशी झाल्यानंतर संग्राम पाटील हे त्यांच्या मूळगावी म्हणजे जळगाव जिल्ह्यातील एरंडोलकडे रवाना झाले. डॉ. संग्राम पाटील हे त्यांच्या पत्नीसोबत शनिवारी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास लंडनवरुन मुंबई विमानतळावर पोहोचले. ते विमानतळावर येतात मुंबई पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.
१४ डिसेंबर २०२५ रोजी ’शहर विकास आघाडी’ या नावाने असलेल्या सोशल मीडिया अकाउंटवरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविरोधात एक मजकूर प्रसिद्ध झाला. त्यावर भाजपच्या सोशल मीडिया संयोजकांनी तक्रार दाखल केली. याच तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी संग्राम पाटील यांची चौकशी केल्याची माहिती आहे. मुंबई सायबर पोलिस ठाण्यातील आणखी एका प्रकरणातही संग्राम पाटील यांची चौकशी करण्यात आली आणि नंतर त्यांना सोडण्यात आल्याची माहिती आहे.
डॉ. संग्राम पाटील हे केवळ ब्रिटनचे नागरिक असल्याने त्यांना अटक करण्यात आली नसल्याचं मत अॅड. असीम सरोदे यांनी मांडले. डॉ. संग्राम पाटील यांच्या चौकशीनंतर विरोधी पक्षाच्या विविध नेत्यांनी भाजपा सरकारवर टीका केली. देशातील लोकांवर दबाव, दडपण, टाकून लोकांची दिशाभूल करणारे देशातील भाजपावाले एका माणसाला का घाबरलेत? असा प्रश्न काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी विचारला आहे.
देशातील सत्य आणि विवेकाच्या आधारावर देशातील सत्ताधारी भाजपा सरकारला खरे प्रश्न विचारणारे, डॉ. संग्राम पाटील यांना मुंबईतील विमानतळावर झालेली अटक ही, देशातील भाजपा सरकारच्या डरपोकपणाचे जीवंत उदाहरण आहे, असे
राज्यातील काँग्रेसचे नेते सतेज पाटील म्हणाले आहेत. देशातील सत्ताधारी भाजपा सरकारच्या व आरएसएसच्या विचारधारेला आणि देशातील आरएसएसप्रणित सत्ताधारी भाजपा सरकारच्या, विचारधारेच्या सर्व नेत्यांना, प्रश्न विचारणार्यांची एवढी भीती का वाटते?असा प्रश्न सतेज पाटील यांनी सत्ताधारी भाजपा सरकारला विचारला आहे. देशातील सत्ताधारी भाजपा सरकार प्रश्न विचारल्यावर का घाबरत आह असा प्रश्न निर्माण होतो आहे, असे सतेज पाटील म्हणाले आहेत. भाजपा सरकार एका माणसाला घाबरत आहे, असे पाटील म्हणाले आहेत.




