बिहार – बिहारमध्ये ऑल इंडिया प्रेग्नन्सी जॉब सर्व्हिसच्या नावाखाली, लाखो रुपयांना अनेक लोकांना फसवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ‘ऑल इंडिया प्रेग्नन्सी जॉब सर्व्हिस’ चा भयानक जॉब प्रकार आता उघडकीस आला आहे. या प्रकारासाठी १० लाखांची ऑफर देत होते. कंपनीचे काम पाहून देखील बिहार पोलिसांना धक्का बसला आहे. “ऑल इंडिया प्रेग्नन्सी जॉब सर्व्हिस” च्या नावाखाली लाखो रुपयांना बिहारमधील नवादा, हिसुआ मधील नागरिकांना फसवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एक कंपनी स्थापन करुन बिहार राज्यातील अनेक महिलांची फसवणूक करण्यात आली आहे.
बिहारमधील नवादा येथून विचित्र प्रकरण समोर आले आहे. हे प्रकरण अत्यंत धक्कादायक आहे. सायबर फसवणुकीची एक नवीन पद्धत उघडकीस आली आहे, ज्यामुळे बिहार राज्यातील पोलिस आणि जनता यांना धक्का बसला आहे. आश्चर्य वाटेल असा हा फसवणूक प्रकार बिहारमध्ये घडला आहे. बिहार राज्यात ज्यांना मुल होत नाही अशा जोडप्यांना आपल्या जाळ्यात ओेढले आहे. बिहार मधील या आरोपींनी “ऑल इंडिया प्रेग्नन्सी जॉब सर्व्हिस” नावाची कंपनी स्थापन केली, आणि लोकांना फसवले आहे
प्रत्यक्षात, ही संपूर्ण योजना खोट्या अजेंड्यावर आधारित होती. फसवणूक करणारे लोक लोकांना फोन करून सांगत असत, की त्यांना मुल न होणार्या महिलांना, गर्भधारणा कशी करायची हे माहित आहे. त्या बदल्यात, ते ग्राहकांना दहा लाख रुपयांपर्यंत कमाईचे आमिष दाखवत असत. मुल न होणाऱ्या महिलेला गर्भधारणा केल्यास, मोठी रक्कम देण्याचे आश्वासन देत असत. या फसवणुकीला बळी पडून बिहार राज्यातील अनेकांनी नोंदणी शुल्काच्या नावाखाली पैसे दिले आहेत, व बिहार राज्यातील अनेक लोक लाखो रूपयाला फसवले गेले आहेत.
बिहार पोलिसांच्या पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या टोळीने विशेषतः अशा लोकांना लक्ष्य केले, जे आर्थिकदृष्ट्या अडचणीत होते किंवा लवकर पैसे कमविण्याचे स्वप्न पाहत होते. फोन कॉल्समध्ये मोठे दावे, खोटे दावे आणि व्यवसाय पूर्णपणे कायदेशीर, आणि सुरक्षित असल्याची हमी दिली जात असे. या विश्वासाचा फायदा घेत, फसवणूक करणारे नोंदणी शुल्काच्या नावाखाली हजारो ते लाखो रुपये उकळत असत.
बिहारमधील हिसुआ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील, मनवा गावात सायबर फसवणूक करणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती नवादा पोलिसांना मिळाली, तेव्हा ही संपूर्ण फसवणूक उघडकीस आली आहे. माहिती मिळताच, पोलिस अधीक्षक अभिनव धीमान यांच्या मार्गदर्शनाखाली, एक पथक तयार करण्यात आले. जलदगतीने कारवाई करत, पथकाने मनवा गावातील एका घरावर छापा टाकला, जिथे दोन संशयितांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. अटक केलेल्या संशयितांपैकी एक अल्पवयीन आहे, तर दुसऱ्याची ओळख रंजन कुमार अशी झाली आहे.
राज्यातील पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. बिहारमधील या संशयितांनी “ऑल इंडिया प्रेग्नन्सी जॉब“च्या बहाण्याने राज्यातील अनेक लोकांना फसवल्याचे कबूल केले आहे, आणि त्यांनी आधीच लाखो रुपये कमावले होते. चौकशीत असेही उघड झाले आहे की, फसवणूक करणारे केवळ पुरुषांनाच, नव्हे तर बिहार राज्यातील निपुत्रिक महिलांनाही आमिष दाखवत होते. त्यांच्या विशेष तंत्रामुळे गर्भधारणा शक्य होईल असे आश्वासन त्यांना देण्यात आले होते. त्या बदल्यात, त्यांना विविध टप्प्यांवर खंडणी मागितली जात होती. अनेक प्रकरणांमध्ये, राज्यातील महिलांना मानसिकदृष्ट्या इतके त्रास झाला होता की, फसवणुकीचा बळी असूनही, त्या तक्रार दाखल करण्यासही घाबरत होत्या.
बिहार राज्यातील “ऑल इंडिया प्रेग्नन्सी जॉब“ फसवणुक प्रकरणात, मोबाईल, चॅट, सर्व पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. बिहार पोलिसांनी आरोपींकडून ४ मोबाईल फोन जप्त केले आहेत. या फोनमध्ये मोठ्या प्रमाणात कॉल रेकॉर्ड, मेसेज, आणि संशयास्पद चॅटस असण्याची शक्यता आहे. सायबर सेल टीम आता या मोबाईल फोन्सची, बारकाईने तपासणी करत आहे, जेणेकरून ही टोळी किती काळापासून सक्रिय आहे ,आणि त्यांनी राज्यातील किती लोकांना बळी पाडले आहे, हे निश्चित होईल. राज्यातील या फसवणुक प्रकरणात आरोपींविरुद्ध फसवणूक आणि आयटी कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे, आणि पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे, या प्रकरणाचा अधिक तपास बिहार पोलिस करत आहे




