आज मंगळवार, १३ जानेवारी २०२६ ! बजरंगबली ची होणार कृपा, आजचे राशीभविष्य वाचा

SHARE:

राशींभविष्य – आज १३  जानेवारी २०२६ , आजचा वार मंगळवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा भोगी सण अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व १२ राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान गणेशाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? १२ राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

मेष रास (Aries)
मेष राशीच्या लोकांनो आज अनेक गोष्टी करण्याचे स्वातंत्र्य राहील, प्रवासामध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे.

वृषभ रास (Taurus)
वृषभ राशीच्या लोकांनो आज तुमच्या लहरी स्वभावाची झलक इतरांना पाहायला मिळेल, नोकरीमध्ये जास्त काम पडल्यामुळे थोडी चिडचिड होईल.

मिथुन रास (Gemini)
मिथुन राशीच्या लोकांनो आज दुसऱ्यांना सहकार्य करण्यात तत्पर राहाल, महिलांनी अहंकार थोडा बाजूला ठेवावा.

कर्क रास (Cancer)
कर्क राशीच्या लोकांनो आज उच्च ध्येय ठेवले तरी कमकुवत मनाचे असल्यामुळे धाडस कमी दाखवा.

सिंह रास (Leo)
सिंह राशीच्या लोकांसाठी आज घरामध्ये सर्वांनी शिस्त पाळावी असे वाटणे साहजिक आहे, परंतु त्याची सुरुवात प्रथम तुमच्या पासून करा.

कन्या रास (Virgo)
कन्या राशीकांनो आज घरातील मोठ्या माणसांची मते तरुणांना पटणार नाहीत, त्यामुळे थोडा ताण निर्माण होईल.

तूळ रास (Libra)
तूळ राशीच्या लोकांनो आज नोकरीमध्ये कोणावर अवलंबून राहू नये, स्वतःची कामे स्वतः करावीत.

वृश्चिक रास (Scorpio)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज मित्रमंडळींच्या विचित्र वागण्याचा त्रास होईल, नोकरी व्यवसायात एखादे काम करताना धाडसाचा भाग कमी राहील.

धनु रास (Sagittarius)
धनु राशीच्या लोकांनो आज वरिष्ठ अधिकाऱ्यांना घाबरून राहाल, जिथे पैसा खर्च करायला पाहिजे तेथे न केल्यामुळे घरातील लोकांची चिडचिड सहन करावी लागेल.

मकर रास (Capricorn)
मकर राशीच्या लोकांनो आज प्रेम प्रकरणात घरच्या विरोधाला तोंड द्यावे लागेल, महिलांनी कामाचे नियोजन करावे.

कुंभ रास (Aquarius)
कुंभ राशीच्या लोकांनो आज कोणतीही आग्रही वृत्ती ठेवली नाही तरी, वरिष्ठांच्या सांगण्यावरून नोकरीमध्ये मनाविरुद्ध काम करावे लागेल.

मीन रास (Pisces)
मीन राशीच्या लोकांनो आज घरात जवळच्या माणसांचे अहंकार जोपासत बसावे लागल्यामुळे थोडी चिडचिड होईल.

(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल रयत रक्षक न्यूज कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Leave a Comment

अधिक वाचा