अमरावती – प्रभाग क्र. ३ (ब) ना.मा.प्र. पुरुष मधील नवसारी या परिसराचा सर्वांगीण विकास करून जुन्या शहराचा ऐतिहासिक वारसा जपणे आणि नागरिकांना आधुनिक सुविधा देणे हेच माझे मुख्य ध्येय असल्याचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अभिजीत विनायकराव वानखडे यांनी ठामपणे प्रतिपादन केले आहे. ही निवडणूक मी जनतेच्या आशीर्वादाने लढवत आहे, असे वानखडे यांनी सांगितले. प्रभागाचा सर्वांगीण विकास हेच आमचे प्रमुख ध्येय असून त्याला सर्वाधिक प्राधान्य देण्यात येणार आहे. माजी आमदार प्रवीणभाऊ पोटे यांच्या सहकार्याने या प्रभागाचा चेहरा मोहरा बदलण्याचा आमचा ठाम निर्धार आहे.
जनता जनार्दनाने संधी दिल्यास प्रभागाचा विकास साधून मतदारांच्या विकासाला कुठेही तळा जाऊ देणार नाही अशी ग्वाही अभिजीत विनायकराव वानखडे यांनी दिली आहे. रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र यांच्याशी संवाद साधताना त्यांनी स्पष्ट केले की, या प्रभागातील भाजीपाला विक्रेत्यांना ऊन-पावसापासून संरक्षण देण्यासाठी तिथे भव्य घुमट उभारण्यासोबतच ऐतिहासिक परकोटचे दरवर्षी सौंदर्यकरण करण्यावर त्यांचा भर असेल.
गेली अनेक वर्षे रखडलेल्या विकास कामांना गती देऊन प्रभागाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी ते सज्ज आहेत. अभिजीत विनायकराव वानखडे यांनी गेल्या दशकापासून आपल्या मित्रमंडळी सोबत प्रवीण भाऊ पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिले आहे. कोरोनाच्या भीषण काळात केलेली मदत असो व नियमित आरोग्य शिबिरांचे आयोजन त्यांनी जनसेवेचा वसा अखंड जपला आहे युवकांसाठी क्रीडा प्रतियोगिता राबवून त्यांनी जनमानसात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
जुन्या लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेमुळे या भागातील पाण्याचा प्रश्न आणि सांडपाण्याची व्यवस्था विस्कळीत झाली असून ती प्राधान्याने सुधारण्याचा शब्द त्यांनी दिला आहे. पालिका शाळांचे संगणकीकरण करून शिक्षणाचा दर्जा उंचावणे मोबाईल मध्ये हरवलेल्या चिमुकल्यांना मैदानी खेळांकडे वळवण्यासाठी सुसज्य क्रीडांगणे विकसित करणे अशा बहुआयामी विकास आराखड्यामुळे मतदारांचा त्यांना प्रचंड पाठिंबा मिळत आहे.
लोकसेवा व विकासाचा नवा संकल्प अभिजीत वानखडे यांनी सामाजिक कार्याचा भक्कम वारसा जपला असून आरोग्य शिक्षण या विषयांवर विशेष भर आहे. प्रभागातील प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी त्यांनी तयार केलेला कृती आणि सामान्य माणसांच्या सुखदुःखात धावून जाण्याची त्यांची वृत्ती यामुळे प्रभाग क्रमांक 3 नवसारी मध्ये बदलाचे वारे वाहत असून त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.




