मुंबईत मतदार यादीतून, अनेकांची नावे गायब, दादरमध्ये मतदानाच्या पहिल्याच 1 तासात काही ठिकाणी घोळ

SHARE:

मुंबई – मुंबईत मतदार यादीतून, अनेकांची नावे गायब आहेत, तर दादरमध्ये मतदानाच्या पहिल्याच १  तासात काही ठिकाणी घोळ झाला आहे. दादर या मतदार संघात प्रचंड गोंधळ झाला आहे, तर मतदार यादीतून अनेकांची नावं गायब आहेत. मुंबईतील काही मतदारांचे नाव वार्ड क्रमांक १९२ मधून १९१ मध्ये गेले आहे , पण १९१ मध्ये ही नाव नसल्याची बाब समोर आली आहे, त्यामुळे मतदान करण्यासाठी पहिल्याच 1 तासात मतदारांना मोठी अडचण होत आहे.

राज्यात २९ महानगरपालिका निवडणुकीसाठीचे आज मतदान पार पडत आहे. एकीकडे मतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे तर, दुसरीकडे मतदानाच्या पहिल्याच १ तासात काही ठिकाणी घोळ दिसून आला आहे. दादरमध्ये मतदार यादीत घोळ असल्याचे मतदारांनी म्हटले आहे. दादरच्या बालमोहन विद्यामंदिर येथे आलेल्या मतदारांचे नाव यादितून गायब असल्याची खंत मतदारांनी व्यक्त केली आहे. १  तासाभरापासून मतदान करण्यासाठी मतदार धावपळ करत आहे, पण थेट यादीत नावच नाही ,त्यामुळे मतदारांनी संताप व्यक्त केला आहे. तर काही मतदारांचे नाव कुठेच दिसत नाही.

याचबरोबर १९१ च्या यादीतून संपूर्ण ५ जणांचे कुटुंबाचे नाव वगळण्यात आल्याचा, प्रकार समोर आला आहे. या मतदारांनी बोलताना सांगितलं की, संपूर्ण कुटुंबाचे नाव नाही आहे ,असे एक महिला म्हणाली आहे. तर एका मतदाराचं नाव यादीत नसल्याने, ते नाव शोधण्यासाठी १  तासाभरापासून फिरत आहेत. तर एका मतदाराने सांगितले की, आम्ही दादरमध्येच राहतो, आमचा वॉर्ड आहे १९२ . आता आम्हाला दिलेल्या स्लीपमध्ये १९१  लिहून दिले आहे, मी आता सकाळी इथे येऊन पाहिलं, नाव सापडत नाही. आमचं सुरूवातीपासून दिलेल्या वॉर्डमधून आमचं नाव गायब आहे, जेव्हापासून मतदान करतो आहे, तेव्हापासून इथेच आहे. जवळपास 30 ते ४० वर्षे तिथेच मतदान केलं आहे, आता ते सांगत आहे, नाव दुसऱ्या ठिकाणी आलं आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Leave a Comment