पुण्यात भाजपाने उमेदवारी वाटताना, चारित्र्यहीन लोकांचे वेगळे आरक्षण टाकल्याचा, शिंदेंगटाचा शिवसेना नेता रविंद्र धंगेकरांचा भाजपावर गंभीर आरोप

SHARE:

पुणे – पुण्यात भाजपाने उमेदवारी वाटताना, चारित्र्यहीन लोकांचे वेगळे आरक्षण टाकल्याचा, शिंदेंगटाचा शिवसेना नेता रविंद्र धंगेकरांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे. एकनाथ शिंदेंच्या नेत्याने पोस्ट केलेल्या या व्हिडीओने पुण्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून, नवीन वादाला तोंड फुटले आहे. पुण्यात राज्यातील सत्ताधारी पक्षच आमने-सामने आले आहेत.

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. पुण्यात एका व्हिडीओने खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रविंद्र धंगेकर यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडीओ पोस्ट करत, भाजपावरच टीका केली आहे. “भाजपाने उमेदवारी वाटताना चारित्र्यहीन लोकांचे वेगळे आरक्षण टाकले आहे. पत्नी प्रतिभा धंगेकर या निवडणुकीमध्ये प्रभाग २३ मधून निवडणूक लढवत आहेत. धंगेकर हे कसबा पेठचे माजी आमदार आणि शिवसेनेचे महानगरप्रमुख आहेत. त्यांनी आता महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या भाजपावरच टीका केली आहे.

पुण्यात भाजपाने चारित्र्यहीन लोकांचे वेगळे आरक्षण टाकले आहे, तर भारतीय जनता पार्टीच्या महिला उमेदवाराच्या पतीवर गंभीर आरोप करत, तो बारमध्ये बारबालांसोबत नाचत असल्याचा, दावा करणारा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना धंगेकरांनी, भाजपाच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “भाजपाने उमेदवारी वाटताना, चारित्र्यहीन लोकांचे वेगळे आरक्षण टाकले असल्याचे दिसून येत आहे,“ अशी टीका शिंदेगट शिवसेना नेते, धंगेकरांनी आपल्या पोस्टमधून भाजपावर टीका केली आहे.

“खरेतर प्रचार प्रमुखच महापालिकेच्या टेंडरचा पैसा, डान्सबारमध्ये उडवत असेल तर, तिकीट दिलेल्या उमेदवारांकडून काय अपेक्षा ठेवणार? ते सुद्धा या चारित्र्यहीन क्वालिटीचेच आहेत. प्रभाग क्रमांक १२ मधील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार असलेल्या एका, महिलेच्या पतीचा देखील ,असाच व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्यक्ती शिवाजीनगर मतदारसंघाच्या आमदारांचे, सर्व आर्थिक विषय सांभाळतो. या सगळ्या आर्थिक विषयातून केलेल्या कमवलेल्या पैशात, बारबालांसाठी कोटा आरक्षित ठेवलेला आहे,“ अशी टीका धंगेकरांनी भाजपावर केली आहे.

एवढ्यावरच न थांबता धंगेकरांनी भाजपामधील, पुण्यातील मुख्य नेत्यांचा उल्लेख करत त्यांना, थेट प्रश्न केला आहे. राज्यात संस्कृतीच्या गप्पा मारणारे भाजपाचे खासदार मुरलीधर मोहोळ आणि भाजपाचे चंद्रकांत पाटील यांनी या गोष्टीचा खुलासा तरी करावा की, अशा किती जागा राज्यातील भाजपामध्ये चारित्र्यहीन लोकांसाठी राखीव आहेत, अशी टीका धंगेकरांनी पोस्टमधून भाजपावर केली आहे.

पुण्यात महायुतीतील अंतर्गत कलहामुळे , रवींद्र धंगेकर यांना जागावाटपा संदर्भातील काही बैठकींमध्ये डावलले गेले. भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांच्यासहीत, काही स्थानिक नेत्यांचा धंगेकरांना विरोध होता. जैन बोर्डिंग प्रकरणातील टीकेमुळे, धंगेकर पुणे भाजपाच्या नेत्यांना नकोसे असल्याची चर्चा होती. परंतु प्रतिभा धंगेकर यांच्या उमेदवारीला थेट विरोध कोणत्याही भाजपा नेत्याने केला नाही. मात्र अंतर्गत विरोध पुण्यात आजही होत आहे. राज्यातील महापालिका निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशीही भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेमधील वाद वाढत आहे, असे चित्र पुण्यात पाहायला मिळत आहे.

Leave a Comment

अधिक वाचा