नाशिक – यावेळी महापालिका निवडणूक अनेक मुद्यांनी वादात सापडली आहे. यामुळे पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले जात आहे, बोटाची शाई पुसणे, दुबार मतदार, बोगस मतदान, पाडू मशीन, प्रचार संपल्यानंतरही उमेदवाराला प्रचाराची मुभा देण, ईव्हीएम बंद पडणं, मतदार यादीत नावं न सापडणं, यासारख्या मुद्यांवरून विरोधी पक्ष निवडणूक आयोगाला लक्ष करत असताना आता नाशिकमध्ये एक धक्कादाय प्रकार समोर आला आहे. धनुष्यबाणाचे बटन दाबल्यानंतर कमळ चिन्हासमोरची लाईट लागते, असा मोठा दावा शिंदे गटाच्या उमेदवाराने केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ईव्हीएममध्ये फेरफार करता येत नाही, असा निवडणूक आयोगाचा दावा फोल ठरला आहे.
नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान आज प्रभाग क्रमांक 24 मध्ये मोठा राजकीय गोंधळ पाहायला मिळाला. नाशिकमधील गोविंदनगर भागातील ग्रामदेव प्राथमिक शाळेत असलेल्या मतदान केंद्रावर हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. येथील मतदार गिरीश शिरवाडकर यांनी तक्रार केली की त्यांनी एका चिन्हाला मत दिले असता दुसऱ्याच चिन्हासमोरचा लाईट लागला. या प्रकारामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून अनेक मतदारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारी दाखल केल्या आहेत.
यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार यांनी मोठा आरोप केला आहे. ईव्हीएमवर धनुष्यबाणाचे बटन दाबल्यानंतर भाजपच्या चिन्हापुढील लाईट लागत आहे, असा खळबळजनक दावा शिंदे गटाच्या उमेदवार डॉ. पुनम महाले यांनी केला आहे.
शिंदे गटाच्या उमेदवार डॉ. पुनम महाले यांनी केवळ मशीनमधील बिघाडाचाच आरोप केला, तर त्यांनी प्रशासनावरही निशाणा साधला आहे. ज्या मतदारांनी या गैरप्रकाराबाबत लेखी तक्रार केली, त्यांना केंद्रावर धमकवण्यात आले, असा आरोप त्यांनी केला आहे. निवडणूक आयोगाने मात्र हे आरोप फेटाळले असून, ईव्हीएममध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नसल्याचे प्राथमिक स्तरावर स्पष्ट केले आहे. मात्र, शिंदे गटाच्या आक्रमक पवित्र्यामुळे या प्रभागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
माहित असावे कि हि पहिली घटना नाही. यापूर्वी देखिल असा दावा करण्यात आला आहे. मात्र तेव्हाही निवडणूक आयोगाने असे दावे फेटाळून लावले होते.




