अमरावती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबर धक्का बसला आहे. अमरावती महापालिका निवडणुकीत त्यांचे मामेभाऊ विवेक कलोती यांचा दारूण पराभव झाला आहे. अटीतटीच्या लढाईत काँग्रेसचे उमेदवार संजय शिरभाते यांनी विवेक कलोती यांना पराभूत केले. बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षामुळेच फडणवीस यांच्या मामेभावाचा पराभव झाला, असा आरोप भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी केला आहे.
एकीकडे राज्यातील बहुतेक महापालिकांवर भाजपची वाटचाल सुरू असताना विदर्भात दोन मोठे धक्के बसले आहेत. अमरावतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मामेभाऊ विवेक कलोती यांचा वार्ड क्रमांक १४ ड मध्ये दारुण पराभव झाला आहे. अटीतटीच्या लढाईत काँग्रेसचे उमेदवार संजय शिरभाते यांनी विवेक कलोती यांना पराभवाची धुळ चारली. बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षामुळेच फडणवीस यांच्या मामेभावाचा पराभव झाला, असा आरोप भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी केला आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांना खरंतर विदर्भात दोन मोठे धक्के बसले आहेत. फडणवीस यांचे मामेभाऊ विवेक कलोती यांचा पराभव झाला आहे. त्याचबरोबर आमदार श्रीकांत भारतीय यांचा भाऊ तुषार भारतीय यांचाही पराभव झाला आहे. साई नगर प्रभागात भाजपचे नेते तुषार भारतीय पराभूत झाले आहेत. रवी राणांचे निकटवर्तीय युवा स्वाभिमानचे उमेदवार सचिन भेंडे त्यांनी तुषार भारतीय यांचा पराभव केला. तुषार भारतीय देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. या दोघांचा निवडणुकीत पराभव झाल्याने फडणवीसांना मोठा धक्का मानला जात आहे.
याशिवाय अकोल्यात राज्याचे कामगारमंत्री आणि पालकमंत्री आकाश फुंडकर यांनाही मोठा झटका बसला आहे. आकाश फुंडकर यांचे सख्खे मावसभाऊ आणि भाजप उमेदवार सागर शेगोकार यांचा पराभव झाला आहे. वंचितचे शहराध्यक्ष निलेश देव यांनी त्यांचा पराभव केला आहे. प्रभाग क्रमांक ३ हा भाजप आणि संघाचा बालेकिल्ला मानला जातो. संघाच्या या बालेकिल्ल्यातच भाजप उमेदवार सागर शेगोकर यांचा पराभव झाला आहे.




