महानगर पालिकेमध्ये भाजपाचाच गुलाल, तर एमआयएम ची जोरदार मुसंडी; मुंबई मधे काँग्रेस चे समाधान कारक प्रदर्शन, तर ठाणे चा गड राखण्यात शिंदे ला यश

SHARE:

मुंबई – राज्यातील २९ महापालिका निवडणुकांचा निकाल अखेर लागला राज्यातील बहुतांश पालिका भारतीय जनता पार्टी ने एक हाती सत्ता मिळवली. शिंदे च्या शिवसेनेने सुद्धा चांगले प्रदर्शन केले असून, काँग्रेस ने सुद्धा समाधानकारक प्रदर्शन केले आहे. तर उद्धव सेना, मनसे, राष्ट्रावादी, राष्ट्रवादी (शप), वंचीत चा फारसा करिष्मा दिसला नाही. यातच एमआयएम ने तब्बल सवाशे नगरसेवक निवडून आणत मोठी मुसंडी घेतली आहे.

काल राज्यातील सर्वच महानगर पालिकांचे निकाल लागले भाजप ने बहुतांश पालिकामधे एक हाती सत्ता मिळवत रिकॉर्ड कायम केले आहे. देशातील सर्वात मोठी महापालिका असलेली बृहन्मुंबई महानगर पालिका मधे शेवटी भाजपचाच महापौर होणार असल्याचे निश्चित झाले आहे. भाजप+शिवसेना महायुती ने ११८ जागा जिंकत पूर्ण बहुमताचा आकडा पार केला आहे. भाजप-८९ तर शिवसेना-२९ जागांवर विजयी झाली आहे. ठाकरे युती ७२  जागांवर विजयी झाली आहे. ठाकरे सेना-६५ , मनसे-६  तर राष्ट्रवादी (शप)-1१  जागेवर समाधान मानावे लागले. यावेळी काँग्रेस ने २४  जागा मिळवत खूप चांगले प्रदर्शन केले आहे तर राष्ट्रवादीला ३  जागांवर समाधान मानावे लागले.
राज्यातील कोणत्या महानगर पालिका मधे कोणाची सत्ता जाणून घ्या –

मुंबई महानगर विभाग –
1. बृहन्मुंबई – महायुती
2. ठाणे – महायुती
3. कल्याण-डोंबिवली – महायुती
4. भिवंडी – महाविकास आघाडी
5. नवी मुंबई – भाजपा
6. पनवेल – भाजपा
7. मीरा-भाईंदर – भाजपा
8. वसई-विरार – बविआ
9. उल्हासनगर – महायुती

पश्चिम महाराष्ट्र विभाग –
1. पुणे – भाजपा
2. पिंपरी-चिंचवड – भाजपा
3. सोलापूर – भाजपा
4. कोल्हापूर – महायुती
5. सांगली-मिरज – भाजपा
6. इचलकरंजी – भाजपा

उत्तर महाराष्ट्र विभाग –
1. नाशिक – भाजपा
2. मालेगाव – इस्लाम
3. अहिल्यानगर – महायुती
4. जळगाव – भाजपा
5. धुळे – भाजपा

मराठवाडा विभाग –
1. संभाजी नगर – भाजपा
2. जालना – भाजपा
3. परभणी – ठाकरे
4. लातूर – काँग्रेस
5. नांदेड – भाजपा

विदर्भ विभाग –
1. नागपूर – भाजपा
2. चंद्रपूर – काँग्रेस
3. अमरावती – महायुती
4. अकोला – भाजपा

Leave a Comment

अधिक वाचा