संभाजीनगरमध्ये पराभूत उमेदवाराच्या घरासमोर तलवार नाचवल्यामूळे, शिंदेंगट शिवसेनेच्या विजयी उमेदवारांवर गुन्हा दाखल

SHARE:

संभाजीनगर – संभाजीनगरमध्ये पराभूत उमेदवाराच्या घरासमोर तलवार नाचवल्यामूळे, शिंदेंगट शिवसेनेच्या विजयी उमेदवारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिजीत जीवनवाल यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या शिवसेनेच्या विजयी उमेदवाराला ,विजयानंतर तलवार मिरवल्यामूळे गुन्हा दाखल झाला आहे. पराभूत उमेदवाराच्या घरासमोर २ तास गोंधळ घालणार्या अभिजीत जीवनवाल यांच्यावर संभाजीनगर पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेमूळे स्थानिक नागरिक व महिलांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे.

राज्यभरातील २९ महानगरपालिकेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. अनेक महानगरपालिकेत भाजप आणि शिंदे यांचे उमेदवार विजयी झाले. तर काही शहरात महापालिका निवडणूक अत्यंत संघर्षमय पाहायला मिळाली. छत्रपती संभाजीनगरात विजयाचा गुलाल उधळल्यानंतर, शिंदेंच्या शिवसेनेचे विजयी उमेदवार अभिजीत जीवनलाल यांनी समर्थकांसह, पराभूत झालेल्या उमेदवाराच्या घरासमोर, तलवार नाचवत जल्लोष केल्याचे समोर आले आहे. हे चित्र पाहून परिसरातील महिला आणि मुलींनी या घटनेचा तीव्र संताप व्यक्त केला होता. त्यांच्या विरोधात वेदांत नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिंदे गटाचे अभिजीत जीवनवाल विजय ठरले. विजयानंतर अर्थातच मिरवणूक काढण्यात आली . पण या मिरवणुकीत विजयी उमेदवार अभिजीत जीवनलाल यांच्यासह समर्थकांनी सार्वजनिक ठिकाणी, तलवार मिरवत मिरवणूक काढल्याने मोठी खळबळ उडाली. इतकच नाही तर पराभूत उमेदवाराच्या घरासमोर २ तास जल्लोष केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तलवार मिरवत घोषणाबाजी करत आणि मोठ्या आवाजात धिंगाणा घालण्यात, आल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

कालपर्यंत हात जोडून आमच्याकडे मते मागितली. नगरसेवक होऊन तासभरही झाला नाही, तोपर्यंत तुम्ही तलवार दाखवत आहात’. आमच्या मूले मुली पुढची ५ वर्ष सुरक्षित राहतील का? असा प्रश्न परिसरातील महिलांनी केला आहे. याची चौकशी करायला हवी असे महिला म्हणाल्या आहेत. तलवार मिरवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, पोलिसांवर कारवाईचा दबाव वाढला होता. या प्रकरणात संभाजीनगर पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा