मुंबईमध्ये अटल सेतूच्या वापराकरिता, ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय, इलेक्ट्रीक वाहनांचा टोल पूर्ण माफ

SHARE:

मुंबई – मुंबईमध्ये अटल सेतूच्या वापराकरिता 50 टक्के कर एक वर्ष सवलत देण्याचा निर्णय, राज्यातील प्रशासनाने घेतला आहे. तर मुंबईतील इलेक्ट्रीक वाहनांचा टोल पूर्ण माफ करण्यात येणार आहे. मुंबईतील अटल सेतूच्या पथकरात आणखी एक वर्ष सवलत दिली आहे, तर मुंबईत वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे व इलेक्ट्रीक वाहनांचा टोल पूर्ण माफ केला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत, अटल सेतूवरुन प्रवास करणार्या वाहनांना, पथकरात सवलत देण्याच्या निर्णयाला मुदतवाढ देण्यात आली आहे.

राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये अटल सेतूच्या पथकरात, आणखी एक वर्ष सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे मुंबईतील वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. याशिवाय मुंबई व नवी मुंबईला जोडणाऱ्या, अटल बिहारी वाजपेयी शिवडी -न्हावाशेवा अटल सेतूच्या वापराकरिता, पथकरात पन्नास टक्के सवलत देण्याच्या जुन्या निर्णयाची मुदत वाढवण्यात आली आहे.

इलेक्ट्रीकल मोटार कार, बसेस यांनाही अटल सेतूच्या पथकरातून, पूर्ण सूट देण्याबाबतचा मुद्दाही समाविष्ट करण्यास आला. यामुळे ई- व्हेईकल्स धारक तसेच अन्य वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने ४  जानेवारी २०२४ रोजीच्या बैठकीत अटल सेतूच्या वापराकरिता, पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाप्रमाणेच पुढे १  जानेवारी २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत पथकर आकारण्यास मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर इतर वाहनांकरिता, एकेरी प्रवासाचा पथकर दर ही निश्चित करण्यात आले आहेत, असे राज्यातील प्रशासनाने म्हटले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा