पुणे – राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांसाठी पुणे जिल्ह्यातील इंदापुरमध्ये, पवार काका-पुतण्याचा राष्ट्रवादी पक्ष एकत्र येणार आहे. इंदापुरात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत. हर्षवर्धन पाटलांची कन्या अंकिता पाटील ,घड्याळाच्या चिन्हावर लढणार आहेत. पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून घड्याळ आणि तुतारी वाजविणारा माणूस, या पक्ष चिन्हांचा सोयीनुसार वापर करण्यात येणार आहे.
पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहे. इंदापुरमध्ये घड्याळावर आणि शक्य त्या ठिकाणी तुतारी चिन्हावर निवडणूक लढवली जाणार आहे. इंदापुरातही तसाच निर्णय घेण्यात आला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या, अंकिता पाटील या घड्याळ चिन्हावर, जिल्हा परिषदेची निवडणूक लढणार आहेत.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील ठाकरे, या बुधवारी घड्याळाच्या चिन्हावरती जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी दाखल करणार आहेत. दोन राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढण्यावर, निश्चिती झाल्यानंतर, अंकिता पाटील या इंदापूर तालुक्यातील बावडा जिल्हा परिषद गटामधून लढणार आहेत. त्यासाठी त्या घड्याळाच्या चिन्हावरती आपली उमेदवारी दाखल करणार आहेत.
आमदार दत्तात्रय भरणे यांचे सुपुत्र पंचायत समितीच्या रिंगणात उतरणार आहेत. इंदापूर पंचायत समिती निवडणुकीमध्ये, राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आपल्या मुलाला म्हणजेच श्रीराज भरणे यांना, निवडणुकीत उभे करणार आहेत. भरणे यांचे पुत्र श्रीराज दत्तात्रय भरणे हे आज बोरी पंचायत समिती गणासाठी, आपली उमेदवारी दाखल करणार आहेत. श्रीराज भरणे यांच्यामुळे भरणे कुटुंबातील दुसरी पिढी ,आता राजकारणात सक्रिय होणार आहे.
राज्यात शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी या चिन्हाचा वापर, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी पक्ष करणार आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून, घड्याळ आणि तुतारी वाजविणारा माणूस या पक्ष चिन्हांचा सोयीनुसार वापर करण्यात येणार आहे. जिथे जे चिन्ह फायद्याचे ठरेल तिथे, ते चिन्ह वापरून उमेदवार उभे केले जाणार आहेत. राज्यातील महापालिका निवडणुकांनंतर, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी एकत्र बैठक करुन, ही योजना ठरवली आहे. पुणे जिल्ह्यात आणि राज्यातील इतर जिल्ह्यांमधे देखील, घड्याळ आणि तुतारी वाजविणारा माणूस अशा दोन्ही चिन्हांवर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडणूक लढणार आहेत.
राज्यात एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील, चिन्हाची लढाई सर्वोच्च न्यायालयात निर्णायक टप्प्यावर पोहोचलेली असताना, दुसरीकडे दोन पक्षांमधील निर्णय देखील निर्णायक टप्प्यावर, पोहोचल्याचे चित्र राज्यात दिसत आहे. त्यामुळे न्यायालयाचा निकाल कुणाच्याही बाजूने लागो, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनी महापालिकेप्रमाणे ,जिल्हा परिषदांच्या निवडणुका देखील, एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात महापालिका निवडणुकीवेळी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आघाडी केली. तरीही भाजपच्या आव्हानाचा दोन्ही पक्ष सामना करू शकले नाहीत. दोन्ही ठिकाणी झालेल्या दारुण पराभवाने दोन्ही पक्षातील नेत्यांना, आणखीन जवळ आणल्याचे चित्र सध्या राज्यात दिसत आहे. मात्र, अजित पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे मात्र दोन्ही राष्ट्रवादीच्या, एकत्र येण्याबद्दल नाराज असल्याचे बोलले जात आहे.
राज्यात महापालिका निवडणूकीनंतर ,राज्यातील प्रत्येक राजकीय पक्षांत न्वीन हालचाली सुरू झाल्या आहेत, असेच चित्र सध्या राज्यात दिसत आहे. राज्यात काही राजकीय पक्षांत अजुनही अंतर्गत संघर्ष सुरू आहे. परंतु राज्यातील महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर, राज्यातील राष्ट्रवादी पक्षाचे राजकीय नेते एकत्र येत आहेत. राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांसाठी, राज्यातील राष्ट्रवादीचे नेते, पवार काका-पुतण्या एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.




