तामिळनाडूमध्ये राज्यपाल आणि मुख्यमंत्री, यांचा राष्ट्रगीतावरून वाद

SHARE:

चेन्नई – तामिळनाडूमध्ये राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांचा राष्ट्रगीतावरून वाद वाढला आहे. राष्ट्रगीतावरून तामिळनाडूत वाद निर्माण झाला आहे. राज्यपालांनी सभागृहातून सभात्याग केला आहे. तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी आणि मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या सरकारमधील वाद आता वाढलेला आहे.

विधानसभेच्या अधिवेशनात राष्ट्रगीताचा अवमान झाल्याचा आरोप करत, राज्यपालांनी थेट सभागृहातून बाहेर पडणे पसंत केले आहे. तमिळ गीतासोबतच राष्ट्रगीतही वाजवले जावे, ही राज्यपालांची मागणी विधानसभा अध्यक्षांनी, फेटाळून लावल्याने हा वाद निर्माण झाला आहे.

विधानसभेच्या सत्राची सुरुवात, परंपरेनुसार तमिळ गीताने झाली. राज्यपालांनी आग्रही मागणी केली की , तमिळ गीतासोबतच राष्ट्रगीतही वाजवले गेले पाहिजे. या मागणीवरून विधानसभा अध्यक्ष अप्पावू व राज्यपाल, यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. अध्यक्षांनी ही मागणी मान्य करण्यास नकार दिल्यानंतर, संतापलेल्या राज्यपालांनी अभिभाषण न करताच, सभागृहातून बाहेर गेले आहेत.

सभागृहा बाहेर पडल्यानंतर, तामिळनाडुच्या राज्यपालांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे.‘राष्ट्रगीताला योग्य सन्मान, दिला जात नाही, याचे मला दुःख वाटते. माझ्या भाषणात, वारंवार अडथळे आणले गेले. मला माझ्या जबाबदारीची पूर्ण जाणीव आहे, पण राष्ट्रगीताचा सन्मान हा असायला हवा, असे आर. एन. रवी यांनी म्हटले आहे. इतकेच नव्हे तर, ‘बोलताना माझा माईक बंद करून , माझा अपमान करण्यात आला,’ असा गंभीर आरोपही राज्यपाल आर. एन. रवी यांनी तामिळनाडुचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन आणि तामिळनाडू सरकारवर केला आहे.

तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी ,तामिळनाडू राज्यात सलग तिसऱ्या वर्षी विधानसभेच्या सत्रावर बहिष्कार टाकलेला आहे. आर. एन. रवी यांनी, तामिळनाडू विधानसभेच्या सत्रावर बहिष्कार टाकण्याची, ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी 2024 आणि 2025 मध्येही त्यांनी, राज्य सरकारच्या धोरणांशी असहमती दर्शवत भाषण देण्याचे टाळले होते. राजभवनाने प्रसिद्ध केलेल्या , सरकारवर असहकार्याचा आरोप करण्यात आला आहे.

तामिळनाडूचे विधानसभा अध्यक्षांनी प्रत्युत्तर दिले आहे. राज्यपालांच्या आरोपांवर विधानसभा अध्यक्ष, अप्पावू यांनी तत्काळ स्पष्टीकरण दिले. ‘विधानसभेत केवळ निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना, त्यांचे विचार मांडण्याची मुभा असते. कोणीही आपल्या अटी , सभागृहावर लादू शकत नाही. सरकारने राज्यपालांच्या भाषणाची, सर्व तयारी केली होती, पण त्यांनी स्वतःच नकार दिला,’ असे विधानसभा अध्यक्ष, अप्पावू यांनी सांगितले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा