मुंबई – राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वांचे लक्ष लागून राहिलेली महापौरपदाची आरक्षण सोडत आज मंत्रालयात अखेर पार पडली. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पूर्ण झाली. महाराष्ट्रात १५ जानेवारीला मतदान पार पडले होते. त्यानंतर १६ जानेवारीला निकाल जाहीर झाला आहे. या सोडतीमुळे अनेक महापालिकांमध्ये कोणत्या पक्षाचा महापौर बसणार याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे.
या आरक्षण सोडतीमुळे राज्यातील अनेक मोठ्या शहरांमधील सत्तेची समीकरणे पूर्णपणे बदलणार आहेत. विशेषतः महिला आरक्षणामुळे अनेक दिग्गज नेत्यांना आपल्या प्रभागातील नियोजनात मोठे बदल करावे लागणार आहेत.
आरक्षणाचे सविस्तर गणित
मंत्रालयात झालेल्या या सोडतीनुसार २९ महापालिकांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे करण्यात आले आहे
– अनुसूचित जाती (SC) : 3 महापालिका
– अनुसूचित जमाती (ST): 1 महापालिका (कल्याण-डोंबिवली)
– इतर मागासवर्गीय (OBC): ८ महापालिका
– सर्वसाधारण (खुला प्रवर्ग): १७ महापालिका
या आरक्षण सोडतीमुळे अनेक राजकीय गणिते बदलणार असून, विशेषतः महिला आरक्षणाने अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रभागातील समीकरणे आव्हानात्मक ठरणार आहेत.
विभाग व सोडत नुसार महापौर
कोकण विभाग –
– बृहन्मुंबई – सर्वसाधारण (ओपन) महिला
– ठाणे – अनुसूचित जाती (एससी) खुला
– नवी मुंबई – सर्वसाधारण (ओपन) महिला
– कल्याण-डोंबिवली – अनुसूचित जमाती (एसटी) खुला
– उल्हासनगर – नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) खुला
– मिरा-भाईंदर – सर्वसाधारण (ओपन) महिला
– भिवंडी-निजामपूर – सर्वसाधारण (ओपन) खुला
– वसई-विरार – सर्वसाधारण (ओपन) खुला
– पनवेल – नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) खुला
पश्चिम महाराष्ट्र विभाग
– पुणे – सर्वसाधारण (ओपन) महिला
– पिंपरी-चिंचवड – सर्वसाधारण (ओपन) खुला
– सोलापूर – सर्वसाधारण (ओपन) खुला
– कोल्हापूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) खुला
– सांगली-मिरज-कुपवाड – सर्वसाधारण (ओपन) खुला
– इचलकरंजी – नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) खुला
उत्तर महाराष्ट्र विभाग
– नाशिक – सर्वसाधारण (ओपन) महिला
– अहिल्यानगर – नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला
– धुळे – सर्वसाधारण (ओपन) महिला
– जळगाव – नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला
– मालेगाव – सर्वसाधारण (ओपन) महिला
मराठवाडा विभाग
– छत्रपती संभाजीनगर – सर्वसाधारण (ओपन) खुला
– नांदेड-वाघाळा – सर्वसाधारण (ओपन) खुला
– लातूर – अनुसूचित जाती (एससी) महिला
– परभणी – सर्वसाधारण (ओपन) खुला
– जालना (नवनियुक्त) – अनुसूचित जाती (एससी) महिला
विदर्भ विभाग
– नागपूर – सर्वसाधारण (ओपन) महिला
– अमरावती – सर्वसाधारण (ओपन) खुला
– अकोला – नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला
– चंद्रपूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला
किती महापालिकेत महिला महापौर असणार?
राज्यातील २९ महानगरपालिकांपैकी एकूण १५ महापालिकांमध्ये महिला महापौर विराजमान होतील. 50 टक्के महिला आरक्षणाच्या नियमानुसार या जागांची विभागणी करण्यात आली असून. या सोडतीनुसार अहिल्यानगर, जळगाव, अकोला आणि चंद्रपूर या चार शहरांमध्ये ओबीसी महिला महापौर असतील. तर लातूर आणि नवनियुक्त जालना महानगरपालिकेत अनुसूचित जाती (एससी) महिला प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित झाले आहे. या निर्णयामुळे अनेक प्रस्थापित पुरुष नेत्यांना माघार घ्यावी लागणार असून, राजकीय पक्षांना आता महिला उमेदवारांच्या शोधासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.




