छत्रपती संभाजीनगरमध्ये सावकारी त्रासाला कंटाळून, बटाटा व्यावसायिकाची आत्महत्या

SHARE:

छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगरमध्ये सावकारी त्रासाला कंटाळून, बटाटा व्यावसायिकाने आत्महत्या केली आहे. संभाजीनगर मधील एका व्यावसायिकाने आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली आहे. व्यावसायिकाने सावकाराकडुंन पैसे उधार घेतल्याने व पैसे वेळेवर न दिल्यामुळे, सावकरांकडुंन छळ होत आहे. त्याने ४२ सेंकदाचा व्हिडीओ बनवत सोशल मिडिया वर पोस्ट केला आहे. आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव करीम शेख असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आझम शेख, वसीम बाबू बागवान, विलास शेटे, घायवट, विनोद राजपूत, मुकेश राजपूत आणि विक्रम राजपूत अशी आरोपींची नावे आहेत. शेख करीम हे शहरात बटाटा विक्रीचा व्यवसाय करत होते. व्यवसायाची चक्रे फिरवण्यासाठी त्यांनी , काही खासगी व्यक्तींकडून कर्ज घेतले होते. मात्र, हे कर्ज त्यांच्या जीवावर उठेल ही कल्पना त्यांना नव्हती.

गेल्या काही दिवसांपासून, सावकारांनी कर्जाच्या वसुलीसाठी त्रास देत होते. १९ जानेवारी रोजी, जेव्हा शहरात आठवडी बाजार भरला होता, तेव्हा एका महिला सावकाराने , भरबाजारात करीम यांना अडवून अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. सर्वांसमोर झालेला हा अपमान करीम, यांच्या जिव्हारी लागला. इतकेच नाही, तर आरोपींनी त्यांच्या घरापर्यंत जाऊन, कुटुंबासमोरही त्यांना मानसिक त्रास दिला होता.

काल सकाळी, करीम यांनी, आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ संदेश रेकॉर्ड केला. “माझे कुटुंबावर खूप प्रेम आहे, पण या सावकारांच्या त्रासाला आता मी कंटाळलो आहे,“ असे म्हणत त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, शहरात या घटनेवरून संताप व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणात ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी, घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. मृताच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आणि व्हिडिओ पुराव्याच्या आधारे, पोलिसांनी ७  जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा, गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये अन्नू आझम शेख, वसीम बाबू बागवान, विलास शेटे, घायवट, विनोद राजपूत, मुकेश राजपूत आणि विक्रम राजपूत या आरोपींचा यांचा समावेश आहे. या प्रकरणात अधिक तपास संभाजीनगर पोलिस करत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा