बिहारमध्ये मोठ्या बनावट नोटा रॅकेटचा भंडाफोड, भाजपच्या माजी प्रवक्त्याला अटक

SHARE:

नवी दिल्ली –संस्कारी पार्टी असल्याचा ढोल बडवणार्या भाजपच्या अनेक नेत्यांवर, बलात्कार, हत्या, खंडणी, धमकी, असे संगिन आरोप लागलेले आहेत. आता बिहारमधील समस्तीपूर जिल्हयात भाजपच्या एका नेत्याच्या घरी एका मोठ्या बनावट नोटा रॅकेटचा भंडाफोड झाला आहे. पंकज कुमार लाल असे या भाजप नेत्याचे नाव असून ते भाजपचे माजी जिल्हा प्रवक्ते राहिलेले आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, हरियाणा आणि बिहार स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) च्या पथकांनी समस्तीपूर जिल्ह्यातील दलसिंहसराय उपविभागातील अजनौल गावात भाजपचे माजी जिल्हा प्रवक्ते पंकज कुमार लाल त्यांच्या निवासस्थानी छापा टाकल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. या दरम्यान पोलिसांकडून बनावट देखील जप्त करण्यात आल्यात. तथापि, या बनावट नोटांची रक्कम किती होती हे कळू शकले नाही.

डीएसपीने सांगितले की तो १ लाख रुपयांच्या बनावट नोटा 30 हजार रुपयांना बदलून देत असे. वृत्तानुसार, बनावट नोटा दुप्पट करणाऱ्या रॅकेटच्या संदर्भात ही कारवाई करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लाल हरियाणामध्ये एका फसवणूक आणि त्यानंतर दरोड्यात सहभागी होता, त्याने बनावट चलन वापरून त्याचे पैसे दुप्पट केल्याचा आरोप आहे. डीएसपी विवेक शर्मा यांनी सांगितले की तपास सुरू असल्याने सध्या संपूर्ण माहिती उघड करता येणार नाही. छापेमारी पूर्ण झाल्यानंतर सविस्तर माहिती शेअर केली जाईल.
या प्रकरणात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये पंकज कुमार लाल यांचे नाव समोर आले आहे.

निवडणुकीपूर्वी हरियाणामध्ये ही फसवणूक झाली. एका माणसाला २  लाख रुपयांच्या बदल्यात 4 लाख रुपयांचे आश्वासन देण्यात आले होते. व्यवहारानंतर त्याला वाटेतच लुटण्यात आले. भाजपच्या माजी प्रवक्त्याने दोन वर्षांपूर्वी ३  कोटी रुपयांची जमीन खरेदी केली होती.
छापेमारीदरम्यान, हरियाणा एसटीएफ, बिहार एसटीएफ आणि स्थानिक पोलिस स्टेशनचे पथक सकाळपासून अजनौलमध्ये उपस्थित होते. पथकाने पंकज लाल यांच्या घराची झडती घेतली आणि आजूबाजूचा परिसर घेराव घातला. तपास यंत्रणा नेटवर्कच्या इतर संभाव्य सदस्यांचाही शोध घेत आहेत. पंकज कुमार लाल हे पूर्वी भाजपचे जिल्हा प्रवक्ते होते. ते सध्या कल्याणपूर, विभूतीपूर पोलिस स्टेशन परिसरात रेल्वेसाठी रेल नीर पाणीपुरवठा आणि रिक्षा एजन्सी चालवतात.

पंकज कुमार लाल हा हरियाणातील एका बनावट नोटा विक्रेत्याच्या संपर्कात होता असे कळले आहे. तो लोकांकडून ३०  हजार रूपये घेऊन त्यांना १  लाख रुपयांचे बनावट नोटा देत असे. त्यानंतर, हरियाणा एसटीएफने बिहार एसटीएफच्या मदतीने बुधवारी अजनाला येथे छापा टाकला. एसटीएफ टीमने पंकज कुमार लाल यांना विभूतीपूर पोलिस स्टेशन परिसरातील समर्थ कल्याणपूर या त्याच्या गावी नेल्यानंतर त्याच्या घरी टापा टाकण्यात आला.

Leave a Comment

अधिक वाचा