पुणे – पुण्यात निवडणुकीतील मतमोजणी आकडेवारीवरून, ठाकरे शिवसेना नेते वसंत मोरेंनी निवडणूक अधिकार्यांवर आरोप केला आहे. वसंत मोरेंचा निवडणूक अधिकार्यांवरवर आरोप केला आहे की, मतदान आकडेवारी आणि मतमोजणी झालेल्या आकडेवारी फरक मांडला तर, जितक्या मतांनी हारले तितकीच मते कमी झाली आहेत. जनतेचा कौल मान्य आहे, मात्र अधिकाऱ्यांनी ही, निवडणूक जिंकून दिल्याची ,टीका वसंत मोरे यांनी केली आहे.
पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत, अनेक राजकीय नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. पुण्यातील ठाकरेच्या शिवसेनेचे नेते , वसंत मोरेंसह त्यांच्या मुलाचाही पराभव झाला आहे. त्यांनी या निवडणुकीवर आणि आकडेवारी आणि मतमोजणीतील फरकावर आरोप केला आहे. वसंत मोरे यांनी, महानगरपालिकांनी आयुक्तांना दिलेली आकडेवारीवरती ,आणि झालेली मतमोजणीची आकडेवारी यांच्यातील, फरक सांगत आरोप केला आहे. करमकर नावाच्या निवडणूक अधिकारी यांनी, आयुक्तांना दिलेली मतदार आकडेवारी आणि प्रत्यक्षात मतमोजणी आकडेवारी, याच्यामध्ये फरक असल्याचे मोरेंनी निदर्शनास आणून दिले आहे. वसंत मोरे यांनी निवडणूक निकालाची आकडेवारीची प्रत, पोस्ट करत टीका केली आहे.
वसंत मोरेंनी फेसबुक पोस्ट केली आहे. निवडणुकीचा निकाल लागला तो, जनतेचा कौल नसताना काही अंशी तो आम्ही मान्य करतोय, पण निवडणूक निर्णय अधिकारी सौ.करमरकर मॅडम यांनी मुख्य निवडणूक अधिकारी आयुक्त पुणे मनपा यांना, मतदानाच्या दिवशी रात्री प्रभाग क्रमांक ३८ ची एकूण मतदान संख्या ७९ हजार ८२६ इतकी जाहीरपणे सांगीतलेली असताना मतदान मोजणीचे दिवशी मात्र ७८ हजार ७१८ इतकीच मते का मोजण्यात आली ? म्हणजे ११०८ मते कमी कशी काय झाली ? याच करमरकर मॅडम यांच्या अधिकारातील प्रभाग ३६ आणि प्रभाग 37 मधील मतदान आधीच्या दिवशी जाहीर केलेल्या, मतदानापेक्षा वाढले असताना फक्त प्रभाग ३८ मधीलच मतदान ११०८ ने कमी कसे काय होते आणि नेमकी मला १०११ मतेच कमी पडतात ? याचे उत्तर प्रशासनाला द्यावेच लागेल, असं वसंत मोरेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, त्याचबरोबर त्या आकडेवारीचा फोटो देखील त्यांनी शेअर केला आहे.
वसंत मोरे यांचा १०११ मतांनी पराभव झाला आहे.शिंदेंच्या शिवसेनेचे स्वराज बाबर यांना १६,१२२ मते मिळाली आहेत. निवडणूक आयोगाच्या मतदान टक्केवारी, झालेल्या मतदानाच्या आकेडवारीवरुन वसंत मोरेंनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील फरक पाहता, दुसऱ्या दिवशी १०३५ मत वाढलेली दिसत असून मी १०११ मतांनी पराभूत झालो आहे, असे वसंत मोरेंनी म्हटले आहे.




