कोल्हापुरात काम करुन घेण्यासाठी, विकासासाठी तुम्हाला परत नेत्यांना तोंड दाखवावे लागणार; मंत्री हसन मुश्रीफ यांचा बंडखोरांना इशारा

SHARE:

कोल्हापुर – काम करुन घेण्यासाठी, विकासासाठी तुम्हाला परत राजकीय नेत्यांना तोंड दाखवावे लागणार आहे, असे म्हणत, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी बंडखोरांना इशारा दिला आहे. कोल्हापुरात झेडपी व पंचायत समितीला बंडखोरीची सुरूवात झाली आहे. मंत्री हसन मुश्रीफ पक्षांतर्गत बंडखोरांना इशारा दिला आहे. निवडणूक झाल्यावर तुम्हाला नेत्यांना, तोंड दाखवायचे आहे, हे लक्षात ठेवा, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले आहेत. कोल्हापूरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्यांना हसन मुश्रीफांनी इशारा दिला आहे.

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका ,आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी, जिल्हा परिषद निवडणुकीत बंडखोरांना आपल्या भषेत समजावून सांगितले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर, कागल तालुक्यात मोठ्याप्रमाणावर बंडखोरी होत आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ आक्रमक झाले आहेत. जिल्हा परिषदेमध्ये बंडखोरी करून आम्हाला, जे सोडून गेलेत त्याचा विचार करू नका , आपले काम करा, असे मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले आहे. ते काल कोल्हापूर मधील प्रचारसभेत बोलत होते.

कोल्हापुरचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी, तुम्हाला राजकीय नेत्यांना, पुन्हा तोंड दाखवायचे आहे. काम करुन घेण्यासाठी, विकासासाठी तुम्हाला पुन्हा राजकीय नेत्यांना तोंड दाखवायचे आहे. माझा बुथ मजबूत, हे दाखवण्याची संधी आहे. आता कोणी तक्रार करायची नाही. सर्व मिळून काम करायचे आहे. कुठलेही राजकारण मनात ठेवायचे नाही, असे हसन मुश्रीफ म्हणाले आहेत. आपल्याला भविष्यात सुद्धा अशाचप्रकारे, एकत्र काम करावे लागेल. पण काहीजण बंडखोरी करण्याच्या विचारात आहेत, असे हसन मुश्रीफ म्हणाले. त्यांनी संजय मंडलिक यांच्यावर टीका केली आहे.

कोल्हापूरात कोणतीही बंडखोरी खपवून घेतली जाणार नाही, ज्यांनी बंडखोरी करून पक्ष किंवा गट सोडला त्यांना, परत घेतले जाणार नाही, असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. कोल्हापुरात झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीला करवीर तालुक्यात सर्वाधिक मोठी लढत होणार आहे, राधानगरी दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर केल्हापूरमधील कागल तालूक्यात जास्त संघर्षमय निवडणुक होणार आहे. त्यात निवडणुकीच्या आधीच, कोल्हापुर जिल्ह्यात सर्वच राजकीय पक्षांत, पदासाठी, उमेदवारीसाठी, बंडखोरी होताना दिसत आहे.

Leave a Comment

अधिक वाचा