चंद्रपूरमध्ये काँग्रेसमधील अंतर्गत वाद वाढला, गटनेता पदावरून निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये फूट

SHARE:

चंद्रपूर – काँग्रेसमधील अंतर्गत वाद वाढला आहे, तर गटनेता पदावरून काँग्रेसमधील चंद्रपूर महानगरपालिकेसाठी निवडून आलेल्या, नगरसेवकांमध्यचे फूट पडली आहे. राज्यातील चंद्रपूर महानगरपालिकेसाठी, निवडून आलेल्या काँग्रेसच्या २७ पैकी १३  नगरसेवकांना सोबत घेत, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी नागपूर, विभागीय आयुक्त कार्यालयात गटाची नोंदणी केली. चंद्रपूर काँग्रेसमधील अंतर्गत कलह रोज वाढतच चालला आहे. प्रतिभा धानोरकरांकडून १३  नगरसेवकांचा गट वेगळा तयार करण्यात आला आहे. तर विजय वडेट्टीवारांचा यासाठी आक्षेप घेतला आहे. याप्रकरणांमूळे काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि काँग्रेसचे विजय वडेट्टीवार या दोघांच्याही नगरसेवकांमध्ये उघड उघड फूट पडली आहे.

चंद्रपूर महानगरपालिकेसाठी निवडून आलेल्या, काँग्रेसच्या २७ पैकी १३ नगरसेवकांना सोबत घेत काल संध्याकाळी, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी नागपूर, विभागीय आयुक्त कार्यालयात वेगळया काँग्रेसच्या गटाची नोंदणी केली आहे. या घडामोडीची माहिती कळताच, विजय वडेट्टीवार समर्थकांनी, विभागीय आयुक्त कार्यालयात जात ही प्रक्रिया, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलेल्या, पत्राला अनुसरण नाही, अशी विभागीय आयुक्तांकडे भूमिका मांडली आहे, तक्रार केली आहे. त्यामुळे माहितीनुसार या परस्पर वादामूळे आणि दाव्यामुळे, आता विभागीय आयुक्त याबाबत, मंगळवारी आपला निर्णय देणार आहेत.

या आधी काल दिवसभर घडलेल्या घडामोडीनंतर, संध्याकाळी काँग्रेस पक्षात नगरसेवकांत ही उघड उघड फूट पडली आहे. खासदार प्रतिभा धानोरकर अचानक संध्याकाळी, काँग्रेसच्या १३  नगरसेवकांना घेऊन विभागीय आयुक्त कार्यालयात गेल्या, आणि त्यांनी काँग्रेसच्या वेगळया गटाची स्थापना केली आहे. काल नागपुरात आलेले प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी, धानोरकर आणि वडेट्टीवार यांच्याशी स्वतंत्र चर्चा करून, गटनेता पदी लवकरच आपण नवीन नाव पाठवू, असे सांगितले होते.

मात्र, काँग्रेसच्या गटनेता पदाबाबत एकमत न झाल्यामुळे, संध्याकाळपर्यंत गटाची नोंदणी झाली रखडली होती. विजय वडेट्टीवार यांच्याकडून गटनेता पदासाठी देण्यात आलेल्या वसंता देशमुख, यांच्या नावाला प्रतिभा धानोरकर यांचा विरोध आहे. तर प्रतिभा धानोरकर यांच्याकडून देण्यात आलेल्या सुरेंद्र अडबाले यांच्या नावाला वडेट्टीवारांचा विरोध आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटनेत्याचे नाव निश्चित करू शकले नाही. काँग्रेसमधील या गटबाजीचा आणि गोंधळाचा फायदा भाजपाला होऊ शकतो. त्यात आता चंद्रपूरमध्ये, काँग्रेसच्या निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये फुट पडल्यामूळे, काँग्रेसच्या अंतर्गत वाद समोर आला आहे. तर चंद्रपूरमध्ये ही, काँग्रेसच्या निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये, सत्ताधारी भाजपाकडून नगरसेवक फोडाफोडीचे, राजकारण होण्याची शक्यता आहे, भीती आहे, असे चित्र सध्या चंद्रपुरमध्ये दिसत आहे.

Leave a Comment

अधिक वाचा