मुंबई – मुंबईमध्ये २६ जानेवारी २०२६ पासून हार्बर मार्गावर, १४ एसी रेल्वे लोकल सेवा सुरू होणार आहेत. मुंबईतील हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल रेल्वे धावणार आहे. १४ एसी लोकल रेल्वे सेवा २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनापासून, धावणार असल्याची माहिती केंद्रीय व मुंबई रेल्वेकडून देण्यात आली आहे.
मध्य रेल्वने ही घोषणा केली आहे.
मुंबईमध्ये २६ जानेवारी २०२६ पासून म्हणजेच येत्या, सोमवारपासून हार्बर मार्गावरील एसी लोकल सेवा, पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेने याबाबत घोषणा केली आहे. हार्बर मार्गावरील १४ एसी लोकल सेवांचे वेळापत्रक देखील मध्य रेल्वेने जाहीर केले आहे. यामुळे २६ जानेवारी पासून हार्बर मार्गावरील प्रवास अधिक सुखकर होणार आहे, असे मध्यरेल्वे विभागाने म्हटले आहे.
२६ जानेवारी २०२६, सोमवारी प्रजासत्ताक दिनाच्या, दिवशी हार्बर मार्गावरील प्रवाशांसाठी १४ वातानुकुलीत लोकल सेवा सुरु करण्यात येणार आहेत. यामुळे मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कमध्ये, प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. नव्या एसी लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल हार्बर लाईनवर, चालवल्या जातील. सध्या सुरु असलेल्या नॉन-एसी लोकल सेवांच्या जागी १४ एसी नवीन लोकल सेवा सुरु होणार आहे. रेल्वेकडून रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी, एसी लोकल सेवांच्या वेळेत नॉन एसी लोकल सेवा सुरु ठेवली जाईल, अशी मध्य रेल्वेने माहिती दिली आहे.
हार्बर मार्गावर १४ एसी लोकल सेवा सुरु झाल्याने, मध्य रेल्वेच्या मार्गावरील एसी लोकलची संख्या वाढणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ८० लोकल सेवा सुरु आहेत. यात आता हार्बर मार्गावरील १४ एसी लोकल सेवांची भर पडणार आहे. मध्य रेल्वेच्या लोकल सेवांची संख्या १८ ते २० इतकी कायम राहणार आहे. रेल्वेच्या विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, हार्बर मार्गावरील एसी लोकल सेवा २६ जानेवारी २०२६ पासून सुरु करण्यात येणार आहे. प्रवाशांची मागणी असल्याने या मार्गावर, एसी लोकल सेवा सुरु करत असल्याचे, मध्यरेल्वेकडून सांगण्यात आले आहे.




